शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
2
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
3
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
4
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
5
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
6
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
7
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
8
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
9
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
10
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
11
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
12
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
13
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
14
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी
15
संतापजनक! २ मुलांची आई पडली १७ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात, दोघंही झाले फरार; आता महिलेवर POCSO कारवाई!
16
जरांगेंचा होकार, पण जर जीआरमध्ये काही दगा फटका झाला तर...; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा
17
"मला मावशीच्या मिठीतच शांतता मिळते"; पतीचं बोलणं मनाला लागलं, नवविवाहितेनं टोकाचं पाऊल उचललं!
18
रात्री ९ वाजेपर्यंत मुंबई खाली करतो, मराठ्यांची पोरं नाचत जातील, पण...; मनोज जरांगेंचा विखेंना शब्द
19
श्रीसंतची दुखापत अन् RR फ्रँचायझीचा ८२ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा! विमा कंपनीची सर्वोच्च न्यायालयात धाव
20
Manoj Jarange: मनोज जरांगे आजच उपोषण सोडणार? हैदराबाद गॅझेटचा जीआर निघणार, सातारा गॅझेटीयरची जबाबदारी शिवेंद्रराजेंनी घेतली...

ठाण्यात उड्डाणपूलावरून पडल्याने एकाचा मृत्यू घातपात की आत्महत्या? : मृत्यूबाबत गूढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 23:37 IST

गोकूळनगर येथून खोपट एसटी स्टॅन्डच्या दिशेने जाणाऱ्या या कॅसलमील उड्डाणपुलावरुन कोसळून एका ५० वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यु झाल्याची घटना मंगळवारी (४ जून) सकाळी घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही आत्महत्या की हत्या याबाबतही अनेक तर्कवितर्क केले जात आहे.

ठळक मुद्देअवघ्या चार महिन्यातच दुसरा मृत्युराबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलआत्महत्या असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : गोल्डन डाईजनाका ते कॅसलमीलकडे जाणा-या उड्डाणपुलावरून पडून सुमारे ४५ ते ५० वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी १० वा. च्या सुमारास घडली. प्राथमिक अंदाजानुसार ही आत्महत्या असल्याचे राबोडी पोलिसांनी सांगितले. मात्र, हा घातपात, अपघात की आत्महत्या आहे, याबाबतही उलटसुलट चर्चा सुरू होती.अगदी अलिकडेच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी उद्घाटन झालेल्या नव्या को-या कॅसलमील उड्डाणपुलावरून ४ जून रोजी सकाळी ऐन गर्दीच्या वेळी ही मध्यमवयीन व्यक्ती अचानक खाली कोसळली. चालत्या दुचाकीवरून तो कोसळल्याचा सुरुवातीला अंदाज व्यक्त होत होता. मात्र, राबोडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, त्यावेळी पुलावर साधे घसरल्याचे एकही निशाण नव्हते, की कोणतेही वाहन वर किंवा खाली कोसळलेले नव्हते. त्यामुळे या व्यक्तीने खाली उडी मारून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम सूर्यवंशी यांनी सांगितले. अंगात आकाशी रंगाचा शर्ट, पांढरे बनेल आणि राखाडी रंगाची फूल पॅन्ट असलेली ही व्यक्ती डोक्यावर पडल्यामुळे डोक्याच्या भागाचा अक्षरश: चेंदामेंदा झाला होता. त्यामुळे खाली कोसळताच त्याचा अवघ्या काही वेळातच जागीच मृत्यू झाला. रात्री उशिरापर्यंत त्याची ओळख पटलेली नव्हती.राबोडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून उड्डाणपुलावर कोणतेही वाहन न आढळल्याने या प्रकरणाचे गूढ अधिकच वाढले आहे. अपघात झाला असेल तर वाहन नाही. किंवा दुसºया एखाद्या वाहनावरुन तो कोसळल्यानंतर ते वाहन निघून गेले असावे. किंवा कोणीतरी वरुनच त्याला ढकलून दिले असावे, असे अनेक तर्कवितर्क केले जात आहेत. जवळपासच्या दुकान आणि इमारतींचेही सीसीटीव्ही चित्रण तपासले जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.* याआधीही एक मृत्यूचार महिन्यांपूर्वी गोकूळनगर येथून खोपट एसटी स्टॅन्ड आणि जेल तलावाच्या दिशेने जाणा-या या कॅसलमील उड्डाणपुलाचे लोकार्पण झाले. उद्घाटनानंतर २४ तासातच भरधाव वेगाने जाणा-या मोटारसायकलस्वाराचा या पुलावर मृत्यू झाला होता. मंगळवारी सकाळी या पुलावरून स्व. माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे चौकात ही व्यक्ती खाली कोसळल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू