शहरं
Join us  
Trending Stories
1
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
2
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
3
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
4
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
5
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
8
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
9
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
10
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
11
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
12
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
13
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
14
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
15
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
16
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
17
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
18
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
19
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
20
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!

मुंब्य्रात अपघातात नवविवाहितेचा मृत्यू, दहा दिवसांचा विवाह 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2020 02:01 IST

Mumbra Accident News : 'भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी, अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी' या भावगीतातील काल्पनिक घटना मुंब्य्रात प्रत्यक्षात घडली आहे.

- कुमार बडदेमुंब्रा : 'भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी, अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी' या भावगीतातील काल्पनिक घटना मुंब्य्रात प्रत्यक्षात घडली आहे.विवाहानंतर दहाव्या दिवशी येथील नेहा चौधरी या नवविवाहितेचा वाई-पाचगणी रस्त्यावर पसरणी घाटात झालेल्या अपघातात शनिवारी मृत्यू झाला. अवघ्या काही दिवसांपूर्वी आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याच्या आणाभाका घेऊन विवाह (निकाह) करून सुखी संसाराची स्वप्ने रंगवण्यात मग्न असलेल्या तिच्या (अपघातात जखमी झालेल्या) पतीला हातावरची मेंदी सुकण्याआधी ती त्याची साथ सोडून गेल्याची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.१५ ऑक्टोबरला कौसा भागातील एमएम व्हॅली परिसरात राहत असलेल्या इरशाद चौधरी याच्याबरोबर तिचा विवाह झाला होता. विवाहानंतर १९ तारखेला ते दोघे फिरण्यासाठी महाबळेश्वर येथे गेले होते. तेथून २५ ऑक्टोबरला परत येत असताना ते प्रवास करत असलेल्या कारचा चालक घाटामध्ये एका वाहनाला ओव्हरटेक करत होता. त्यावेळी समोरून आलेल्या दुचाकीचालकाला वाचवण्यासाठी त्याने कार उजव्या बाजूला वळवली. त्याचवेळी मागून आलेल्या ट्रकने कारला धडक दिली. यामुळे कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या कठड्यावर आदळून एक हजार फूट खोल दरीत कोसळली. यात नेहाचा घटनास्थळावर मृत्यू झाला. तर, तिचा नवरा इरशाद आणि कारचालक सिराज शेख जखमी झाले. त्यांच्यावर मुंब्य्रातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  या अपघातात तिचा मृत्यू झाल्याचा धक्का इरशादला बसू नये, यासाठी तिचा मृत्यू झाला असल्याची माहिती त्याला अद्याप देण्यात आली नसल्याची माहिती मृत तरुणीचा चुलत भाऊ करीम खान यांनी लोकमतला दिली.

टॅग्स :Accidentअपघातmumbraमुंब्राthaneठाणे