उल्हासनगरातील इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानात सापडला कुजलेला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2019 21:09 IST2019-12-17T21:05:38+5:302019-12-17T21:09:27+5:30
पोलिसांकडून घटनेचा अधिक तपास सुरू

उल्हासनगरातील इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानात सापडला कुजलेला मृतदेह
उल्हासनगर: कॅम्प ४ भाटिया चौक परिसरातील एका बंद इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानात मनोहर सिंग जेथळा याचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली असून विठ्ठलवाडी पोलीस अधिक तपास करत आहेत.
शहरातील भाटिया चौक परिसरातील एका इलेक्ट्रॉनिक्स दुकानातून सोमवारी दुर्गंधी येत असल्याची माहिती सतर्क नागरिकांनी पोलिसांना दिली. विठ्ठलवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दुकान उघडले असता, एक मृतदेह अवस्थेत आढळला. सदर मृतदेह मनोहर सिंग जेधळा यांचा असून त्यांचे घर दुकानाच्या परिसरात आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी मध्यवर्ती रुग्णालयात पाठवला. जेधळा यांचा मृत्यू कशाने झाला, याचा तपास विठ्ठलवाडी पोलीस करत आहेत.