शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
5
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
6
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
7
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
8
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
9
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
10
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
11
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
12
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
13
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
14
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
15
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
16
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
17
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
18
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
20
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार

'दाऊद इब्राहिम पाकिस्तानातच, फोन टॅप होत असल्याच्या भीतीने कॉल करत नाही', इकबाल कासकरची पोलिसांना माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2017 08:54 IST

मोस्ट वॉण्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानातच आहे अशी माहिती अटकेत असलेल्या दाऊदचा भाऊ इकबाल कासकरने पोलिसांना दिली आहे. यासोबतच त्याने दाऊद राहत असलेल्या पाच ते सहा ठिकाणांचे पत्तेही पोलिसांना दिले आहेत.

ठाणे, दि. 22 - मोस्ट वॉण्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानातच आहे अशी माहिती अटकेत असलेल्या दाऊदचा भाऊ इकबाल कासकरने पोलिसांना दिली आहे. यासोबतच त्याने दाऊद राहत असलेल्या पाच ते सहा ठिकाणांचे पत्तेही पोलिसांना दिले आहेत. दाऊद इब्राहिमचा धाकटा भाऊ इकबाल कासकरला ठाणे गुन्हे शाखेने अटक केली आहे. एका खंडणी प्रकरणामध्ये इकबाल कासकरला अटक करण्यात आली. 

पाकिस्तान मात्र वारंवार दाऊद पाकिस्तानात नसल्याचा दावा करत आला आहे. भारताने याआधी दाऊदच्या कराची आणि इतर शहरांमधील पत्त्यांची माहिती देत दाऊद पाकिस्तानात असल्याचा दावा केला होता. इकबाल कासकरच्या माहितीमुळे भारताचा दावा खरा ठरला आहे. 

बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणी मागितल्याप्रकरणी दाऊद इब्राहिम याचा भाऊ इकबाल कासकर आणि त्याच्या तीन साथिदारांना 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. इकबाल कासकरला तीन साथीदारांसह ठाणे खंडणीविरोधी पथकाने  भायखळा येथून अटक केली होती. त्यानंतर त्याला ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. 

दरम्यान इकबाल कासकरने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, 'फोन टॅप होत असल्याच्या भीतीने दाऊद गेल्या तीन वर्षांपासून माझ्याशी आणि इतर नातेवाईकांशी बोलणं टाळत आहे'. मात्र आपण आपला दुसरा भाऊ अनीस अहमदच्या संपर्कात असल्याचा दावा त्याने केला आहे. आपल्या आंतरराष्ट्रीय फोन क्रमांकावरुन अनीस ईद आणि इतर सणांना फोन करतो असं इकबाल कासकरने सांगितलं आहे. 'इकबाल कासकर तपासात सहकार्य करत नसून बोलण्यास नकार देत आहेत. मात्र त्याने आपण 1993 स्फोटातील आरोपी आपला मोठा भाऊ अनीस अहमदच्या संपर्कात असल्याचं मान्य केलं आहे', अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 

अनेक प्रश्नांना इकबाल कासकर नकारात्मक उत्तरे देऊन पोलिसांची दिशाभूल करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दाऊद आणि इकबाल यांच्यात फोनद्वारे वारंवार संवाद झाल्याचा पोलिसांना संशय आहे. परंतु, व्हीओआयपी (व्हाइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल) द्वारे हा संपर्क झाल्याची शक्यता असल्यामुळे बाहेरील कॉलही स्थानिक असल्याचे आढळून येते. त्यामुळे पुरावे मिळवताना पोलिसांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. या टोळीमध्ये मुंबई, ठाण्यातील अनेक जण सहभागी असल्याची माहिती पोलीस तपासात उघड होत आहे. इकबाल हा कोकेनपासून अनेक अमली पदार्थांच्या आहारी गेलेला आहे. याच कारणामुळे दाऊदची आपल्यावर नाराजी आहे. याच नाराजीमुळे दोघांमध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये फोनवर किंवा प्रत्यक्ष बोलणे झाले नसल्याचा दावा त्याने पोलिसांकडे केला. आता त्यात कितपत तथ्य आहे, याचीही चाचपणी करण्यात येत आहे.

दरम्यान, ठाण्यातील काही नगरसेवक आणि नेत्यांचाही सहभाग समोर येत असल्याचा गौप्यस्फोट पोलीस आयुक्तांनी केल्याने ठाण्यातील राजकीय वातावरण तापलेले असतानाच, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांची भेट घेतली. मात्र, त्यांचे नाव अद्याप समोर आले नसल्याचे आयुक्तांनी त्यांना सांगितले.

लवकरच चौघांना अटकदाऊद टोळीतील काही गुंडांची माहिती इकबालकडून तपास पथकाला मिळाली आहे. त्यामुळे मुंबई परिसरातून आणखी तीन ते चार जणांना लवकरच ताब्यात घेण्यात येईल, असेही अभिषेक त्रिमुखे यांनी सांगितले. इकबालसोबत ताब्यात घेतलेल्या तिघांपैकी एकाचा खंडणी प्रकरणात बºयापैकी सहभाग आढळला आहे. त्याचीही अद्याप चौकशी सुरूच आहे. अन्य दोघांना गुन्हे अन्वेषण विभागाकडे चौकशीसाठी दररोज हजर राहण्यास बजावण्यात आले आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिस