शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पोटच्या मुलीच्या कौमार्याचा तिने केला लाखांमध्ये ‘सौदा’: ठाण्यातील महिलेला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 18:20 IST

स्वत:च्याच मुलीच्या कौमार्याचा एका लाखांमध्ये ‘सौदा’ करणा-या ठाण्यातील निर्दयी मातेला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. तिच्याकडून या मुलीचीही सुटका करण्यात आली आहे.

ठळक मुद्देठाण्याच्या कोरम मॉल परिसरातील घटनाएका बडया असामीच्या शोधात असतांना पोलिसांनी पकडलेबारमध्येच काम केल्यामुळे सूचली मुलीच्या सौद्याची कल्पना

ठाणे : पोटच्या १३ वर्षीय मुलीच्या कौमार्याचा एक लाखांमध्ये ‘सौदा’ करुन तिला शरीरविक्रयाच्या व्यवसायात ढकलण्याच्या तयारीत असलेल्या एका लालची आणि तितक्याच निर्दयी मातेला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने रविवारी पहाटेच्या सुमारास अटक केली. तिला १९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.एका बारमध्ये वेटर्सचे काम करणारी ही महिला आपल्याच अल्पवयीन मुलीसाठी गि-हाईकाच्या शोधात असल्याची माहिती वरीष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र दौंडकर यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे १६ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास कोरम मॉलच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील सार्वजनिक रस्त्यावर या यशोधननगर पाडा क्रमांक दोन येथील ३२ वर्षीय महिलेला दौंडकर यांच्या पथकाने ताब्यात घेऊन तिच्याकडून या मुलीचीही सुटका केली. बारमध्येच कामाला असल्यामुळे याच व्यवसायामध्ये आपल्याला चांगली कमाई होईल, या लालचेपोटी तिने आपल्याच मुलीच्या कौमार्याचा एका बडया असामीला सौदा करण्याचे ठरविले होते. त्यासाठीच ती काही गिºहाईकांशी बोलली. ४० हजारांपासून ५० हजारांपर्यंत काही गि-हाईकांडून तिला संमती मिळाली. पण सौदा पक्का होत नव्हता. ती मात्र एक लाखांमध्येच ‘सौदा’ करण्याच्या निश्चयावर ठाम होती. हीच खबर ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली. तिच्याकडे एक लाख रुपयांची रोकड घेऊन एक बनावट गि-हाईक पोलिसांनी पाठविले. चांगली आसामी मिळाल्याचा तिचा समज झाल्याने तिने तयारी दर्शविली आणि ती पोलिसांच्या जाळयात अलगद अडकली. घरची गरीब परिस्थिती असल्यामुळे पैशांची अडचण होती. त्यामुळे आपण हा प्रकार केल्याची कबूली तिने पोलिसांना दिली. तिच्या या कृत्यामुळे कारवाई करणारे पथकही अवाक झाले.............................नुकताच झाला वाढदिवसज्या मुलीच्या कौमार्याचा ‘सौदा’ तिच्याच आईने एक लाखांमध्ये केला. ती मुलगी सध्या सातवीमध्ये शिक्षण घेत असून तिचा १३ डिसेंबर रोजी वाढदिवसही साजरा करण्यात आला होता, अशीही माहिती सूत्रांनी दिली.यापूर्वीही अशा दोन मातांना अटकयापूर्वी २६ जुलै २०१६ रोजी राबोडीतील ‘स्वागत लॉज’ परिसरात आपल्याच १४ वर्षीय मुलीचा शरीरविक्रयासाठी सौदा करणा-या मातेला अटक झाली होती. त्यानंतर १८ आॅगस्ट २०१६ रोजी वागळे इस्टेट भागातील ‘पप्पू का ढाबा’ येथेही स्वत:च्याच १६ वर्षीय मुलीचा अशाच प्रकारे ‘सौदा’ करणा-या महिलेलाही रविंद्र दौंडकर यांच्या पथकाने अटक केली होती.

टॅग्स :thaneठाणेPolice Stationपोलीस ठाणेCrimeगुन्हा