शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

‘ते’ दरोडेखोर १६ डिसेंबरला करणार होते भाजपचे नगरसेवक कुणाल पाटील यांची हत्या

By जितेंद्र कालेकर | Published: December 22, 2017 6:14 PM

नगरसेवक महेश पाटील यांच्या इशा-यानुसार १६ डिसेंबर रोजी भाजप पुरस्कृत नगरसेवक कुणाल पाटील यांच्या खूनाची तयारी झाली होती. तत्पूर्वीच ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने सहा दरोडेखोरांना जेरबंद केले.

ठळक मुद्दे भाजपचेच नगरसेवक कुणाल पाटील यांच्याविरुद्ध झाला गुन्हा दाखल दरोडयातील आरोपींनी दिली माहितीसुपारीतील ५० लाखांपैकी १० लाख रुपये आगाऊ स्विकारले

जितेंद्र कालेकरलोकमत न्यूज नेटवर्कठाणे : अखेर डोंबिवलीतील भाजपा पुरस्कृत नगरसेवक कुणाल पाटील यांना ठार मारण्याची सुपारी दिल्याप्रकरणी भाजपाचेच नगरसेवक महेश पाटील यांच्यासह सात ते आठ जणांविरुद्ध गणेशपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी त्यांना लवकरच अटक केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.भिवंडीच्या कुडूस येथील एका दरोड्याचा तपास पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख यांचे पथक करीत असतांना त्यांनी १३ डिसेंबरला भिवंडीतून कैलास घोडविंदे, राजू शेट्टी, अलुद्दीन शेख, विजय मेनबन्सी आदी सहा जणांना अटक केली. त्यांनी आधी गणेशपुरी भागातील दोन तर वाडा (जिल्हा पालघर) येथील एक अशा तीन दरोडयांची कबूली दिली. या तिन्ही ठिकाणी त्यांनी गोळीबार करुन लाखोंची रोकड लुटली होती. त्यांच्यातील विजय मेनबन्सी याने दिलेल्या माहितीतून कुणाल पाटील यांना भाजपचेच नगरसेवक महेश पाटील यांनी ठार मारण्याची सुपारी दिल्याचेही त्यांनी सांगितले. ५० लाखांच्या या ‘सुपारी’ पैकी १० लाख रुपये रोकड घेतल्याचेही त्यांनी सांगितले. ही माहिती उघड होताच तपास अधिकाºयांनाही धक्का बसला. महेश यांनीही २०१५ मध्ये कुणाल यांना ठार मारण्याची सुपारी दिली होती, असा आरोप आहे. या आरोपाखाली त्यांना अटकही झाली होती. या आणि अन्यही कारणांवरुन दोघांमध्ये गेल्या काही वर्षांपासून वैमनस्य आहे. आरोपींनी महेश पाटील यांचे नाव घेतल्यानंतर पोलीस अधीक्षक महेश पाटील यांनी कोणाच्याही दबावाला बळी न पडता निष्पक्षपणे कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख यांना दिले होते. त्यानुसार याचीखातरजमा झाल्यानंतर गणेशपुरीचे पोलीस निरीक्षक कुंदन जाधव आणि एलसीबीचे व्यंकट आंधळे यांनी याप्रकरणी महेश पाटील, सुजित नलावडे, विजय मेनबन्सी यांच्यासह सात ते आठ जणांविरुद्ध गुन्हा केला आहे. .................पकडले गेल्यामुळे जीव बचावला...यापूर्वी कुणाल या हल्ल्यातून बचावले असल्यामुळे त्यांना पुन्हा १६ डिसेंबर रोजी मारण्याचे ठरले. विजयसह सहा जणांना पोलिसांनी १३ डिसेंबर रोजी पकडल्यामुळे त्यांचा जीव वाचल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :thaneठाणेPolice Stationपोलीस ठाणेCrimeगुन्हा