हळदीत भावाचे लायटर घेऊन नृत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:41 IST2021-02-24T04:41:43+5:302021-02-24T04:41:43+5:30

अंबरनाथ : बहिणीच्या लग्नात भावाने बंदुकीसारखं दिसणारे लायटर घेऊन नृत्य केल्याची घटना अंबरनाथ तालुक्यात घडली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल ...

Dance with yellow brother's lighter | हळदीत भावाचे लायटर घेऊन नृत्य

हळदीत भावाचे लायटर घेऊन नृत्य

अंबरनाथ : बहिणीच्या लग्नात भावाने बंदुकीसारखं दिसणारे लायटर घेऊन नृत्य केल्याची घटना अंबरनाथ तालुक्यात घडली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली. मात्र ती बंदूक नसून लायटर असल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले आहे.

अंबरनाथ तालुक्यात काकोळे गावाजवळ गोरपे नावाचे गाव असून, या गावातील एका मुलीच्या हळदीनिमित्त ऑर्केस्ट्रा ठेवला होता. २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी हा कार्यक्रम सुरू असताना वधूच्या चुलत भावाने कुणाच्यातरी खांद्यावर बसून नृत्य करत हवेत बंदूक नाचवली. हे कुणीतरी चित्रित केले आणि ते व्हायरल केले. हा व्हिडिओ पोलिसांपर्यंत पोहोचताच शिवाजीनगर पोलिसांनी तपास करत बंदूक नाचवणाऱ्या भावाची त्याच्या बंदुकीसह पोलीस ठाण्यात वरात आणली. मात्र पुढील तपासात त्याने नाचवलेली बंदूक ही प्रत्यक्षात लायटर असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी ही बंदूक जमा करून घेत भावाला समज देऊन सोडून दिले. हुबेहूब बंदुकीसारखी दिसणारी लायटर दुकानात किंवा अगदी ऑनलाइनवरून ५०० ते ६०० रुपयात सहज उपलब्ध होतात.

Web Title: Dance with yellow brother's lighter