शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
3
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
5
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
6
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
7
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
8
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
9
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
10
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
11
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
12
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
13
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
14
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
15
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
16
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
17
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
18
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
19
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
20
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल

दामले, म्हात्रे यांच्यात तू-तू, मैं-मैं; वादंगामुळे सभा तहकूब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2018 12:22 AM

स्थायी समिती अधिकाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप

कल्याण : केडीएमसीतील अधिकारी स्थायी समितीत प्रस्ताव मंजुरीसाठी आणताना तो पूर्ण माहितीनिशी आणत नाही. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी स्थायी समिती सभापती राहुल दामले हे अधिकाºयांना पाठीशी घालत आहेत, असा आरोप शिवसेना सदस्य रमेश म्हात्रे यांनी केला. मात्र, तो आरोप दामले यांनी फेटाळला. या मुद्यावरून दामले व म्हात्रे यांच्यात तू-तू मैं-मैं झाले. त्यामुळे सभेचे वातावरण तापल्याने दामले यांनी सभा तहकूब केली.मलनि:सारण केंद्राच्या कामाची देयके ‘गॅमन इंडिया कंपनी’ या नावाऐवजी ‘गॅमन इंजिनीअर्स अ‍ॅण्ड कॉन्ट्रॅक्टर्स’ या नावाने देण्याचा प्रस्ताव बुधवारच्या स्थायी समिती सभेत मंजुरीसाठी ठेवला होता. त्यावर, चर्चेवेळी ‘गॅमन इंडिया’कडून १० वर्षांपासून ही कामे सुरू आहेत. परंतु, ती पूर्ण झालेली नाहीत. कोपर खाडी परिसरात प्रक्रिया न करताच मैला सोडला जात आहे. त्यामुळे खाडीतील मत्स्य शेती आणि परिसरातील भातशेती धोक्यात आली आहे. त्याला जबाबदार कोण? ‘गॅमन इंडिया’ने काम केलेले नाही. मात्र, नाव बदलून त्यांना देयक देण्याचा प्रस्ताव अधिकारी आणतात. कंपनीकडून काम करून कोण घेणार? पम्पिंग हाउस ते मलनि:सारण केंद्रादरम्यान त्यांनी मलवाहिन्याच टाकलेल्या नाहीत. कंपनीने सादर केलेली कागदपत्रे दाखवा. सभेत अपूर्ण माहिती देणाºया अधिकाºयांच्या विरोधात कारवाई का होत नाही. सभापती त्यांना पाठीशी घालत आहेत, असा आरोप म्हात्रे यांनी केला.‘मी अधिकाºयांना पाठीशी घालत नाही. माझ्यावर आरोप करू नका. या विषयात मला काही स्वारस्य नाही. हा विषय मंजूर करणे अथवा स्थगित ठेवणे, हा सभेचा अधिकार आहे’, असे स्पष्टीकरण दामले यांनी दिले. त्यावर सभापती या नात्याने आम्ही तुम्हाला नाही तर कोणाला जाब विचारणार? तुम्ही अधिकाºयांना पाठीशी घालता, असा आरोप म्हात्रे यांनी केला. या मुद्यावर म्हात्रे व दामले यांच्या तू-तू मैं-मंै झाले.म्हात्रे यांचा मुद्दा योग्य आहे, असे समर्थन शिवसेना सदस्य दीपेश म्हात्रे यांनी केले. तर, निलेश शिंदे म्हणाले, ‘कल्याण पूर्वेतही मलवाहिन्या चुकीच्या पद्धतीने टाकलेल्या आहेत. भाजपाचे मनोज राय म्हणाले, ‘प्रत्येक घरातील मलवाहिन्या मुख्य वाहिनीस जोडलेल्या नाहीत.’कार्यकारी अभियंता चंद्रकांत कोलते यांनी याप्रकरणी सभेत माहिती देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या माहितीपर खुलाशाने सदस्यांचे समाधान झाले नाही. रमेश म्हात्रे यांचाही रोख कोलते यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीचा होता. अन्य सदस्यांनीही या मुद्दावर आगपाखड केल्याने ‘गॅमन इंडिया’चा विषय स्थगित ठेवण्यात आला आहे.९१ टक्के बिले बोगसमहापालिकेत छोट्यामोठ्या विकासकामांची ९१ टक्के बिले बोगस केली जात असल्याचा गंभीर आरोपही रमेश म्हात्रे यांनी सभेच्या सुरुवातीला केला. त्याला दामले यांनीही दुजोरा दिला.दामले म्हणाले की, बेकायदा बांधकामांवर कारवाईसाठी महापालिका जी साधनसामग्री मागवते, त्याची ३० लाखांची बिले काढली जातात. बेकायदा बांधकामांची कारवाई प्रभावी होत नसताना ही बिले लाटली जात आहेत.कचराकुंड्या खरेदीचा विषय नव्याने मांडामहापालिका हद्दीत हार्डवेअर अ‍ॅण्ड सॅनिटरीवेअर कचरा हातगाड्या विषय मंजुरीसाठी आला होता. या मुद्यावर दीपेश म्हात्रे म्हणाले, महापालिकेने १०० कचराकुंड्या खरेदी केल्या आहेत.महापालिकेच्या १२२ प्रभागांच्या तुलनेत २२ कुंड्या कमीच आहेत. प्रत्येक प्रभागाला एक कुंडी याप्रमाणे १२२ कुंड्या खरेदी करायला हव्या होत्या. अधिकाºयांचे नियोजन नाही.त्यामुळे त्याचा या विषयात समावेश करावा, अशी मागणी केली. या विषयात समावेश करता येणार नसला तरी हा विषय नव्याने मांडावा, असे दामले यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका