गारपीटीसह झालेल्या पावसात अनेक घरांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2021 23:05 IST2021-05-02T23:04:52+5:302021-05-02T23:05:04+5:30

विजेचे विजेचे खांबदेखील पडल्याने ग्रामीण भागातील वीज पुरवठा देखील खंडित झाला होता

Damage to many houses due to rains accompanied by hail | गारपीटीसह झालेल्या पावसात अनेक घरांचे नुकसान

गारपीटीसह झालेल्या पावसात अनेक घरांचे नुकसान

बदलापूर:  आज सायंकाळी मुरबाडच्या ग्रामीण भागात गारपीटिसह पाऊस झाल्याने अनेक घरांचे नुकसान झाले आहे. सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान सुसाट्याच्या वाऱ्यासह गारपीट झाल्याने अनेक घराचे कौल आणि पत्रेदेखील उडाले.

विजेचे विजेचे खांबदेखील पडल्याने ग्रामीण भागातील वीज पुरवठा देखील खंडित झाला होता. गारपीट एवढ्या मोठ्या प्रमाणात झाली होती की आदिवासी बांधवांना फावडा घेऊन घरासमोरील बर्फाचे गोळे काढण्याची वेळ आली होती. या गारपिटीमुळे शेतातील पालेभाज्यांचा देखील प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे.

Web Title: Damage to many houses due to rains accompanied by hail

टॅग्स :Rainपाऊस