शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

कार्यकर्त्यांच्या लसीकरणासाठी भाजप नगरसेविकेची दादागिरी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2021 6:21 AM

ग्लोबल कोविड सेंटरमधील प्रकार : रांगेतील नागरिकांचा तीव्र संताप

ठाणे : आधीच ठाणे महापालिका हद्दीत कमी-जास्त प्रमाणात लस उपलब्ध होत आहेत. परंतु, आपल्या प्रभागातील नागरिकांना लस मिळवून देण्यासाठी सध्या राजकीय चढाओढ सुरू झाल्याचे दिसत आहे. याचा प्रत्यय शुक्रवारी सायंकाळी ग्लोबल रुग्णालयात दिसून आला. रांगेत असलेल्या नागरिकांना डावलून मी नगरसेवक आहे, आधी माझ्या माणसांना लस द्या, असा दम देऊन लसीकरण करून घेणाऱ्या भाजपच्या मृणाल पेंडसे या नगरसेविकेमुळे येथे चांगलाच राडा झाला. त्यांच्या दादागिरीविरोधात रांगेतील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. त्यांनी येथील स्टाफ नर्सेसलादेखील धमकी दिल्याचा आरोप नागरिकांनी केला. मात्र, चुकीच्या पद्धतीने लसीकरण सुरू असल्याने त्याला विरोध केल्यानेच हे आरोप केल्याचा दावा पेंडसे यांनी केला.

ग्लोबल कोविड सेंटरमध्ये रोजच्या रोज एक हजाराहून अधिक नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. परंतु, शुक्रवारी दुपारी पेंडसे या २०० जणांना त्या ठिकाणी घेऊन आल्या. यामध्ये बरेचसे ज्येष्ठ नागरिक होते. मी नगरसेविका आहे, आधी माझ्या माणसांचे लसीकरण करा, नंतर इतरांचे करा, अशी मागणी त्यांनी केली. परंतु सकाळपासून रांगेत असलेल्या नागरिकांचे आधी लसीकरण केले जाईल, नंतर इतरांचे करू, असे प्रशासनाने सांगितले. यावरून त्यांचा राग अनावर होऊन त्यांनी येथील स्टाफला दमदाटी करून तुम्हाला नोकरीवरून काढून टाकेन, अशी दमबाजी केल्याचा दावा येथील स्टाफ नर्सेसने केला आहे.

डॉ. माळगावकर यांच्याशी चर्चा केल्यानंतरच मी २०० ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणाला घेऊन गेले होते. परंतु, तेथे चुकीच्या पद्धतीने व्हीआयपी रूममध्ये लसीकरण सुरू असल्याने ही बाब उघड केल्यानेच स्टाफ आणि माझ्यामध्ये वाद झाला. मी जर वाद घातला असेल तर माझी वरिष्ठांकडे तक्रार करणे अपेक्षित होते. परंतु, स्टाफने लसीकरण थांबविणे चुकीचे आहे. त्यानंतर उशिरापर्यंत आम्ही थांबलो, रात्री ८.३० पर्यंत लसीकरण सुरू होते.- मृणाल पेंडसे, भाजप नगरसेविका 

यापूर्वी येथे कोणत्याही प्रकारचा गडबड गोंधळ झाला नाही, येथील स्टाफकडून योग्य पद्धतीने लसीकरण केले जात आहे. ज्येष्ठ नागरिक, ४५ वर्षांपुढील नागरिक, उन्हातान्हात बसतात, परंतु, अशा सर्वांना डावलून हा आधी लस घेण्याचा प्रकार अतिशय निंदनीय आहे. केंद्रावर शिवीगाळ केली, नोकऱ्या घालवू, अशी धमकी देणेदेखील अतिशय चुकीचे आहे. यामुळे संबंधित नगरसेविकेवर व त्यांच्या समवेतील पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, अन्यथा पुन्हा असा प्रकार घडला तर त्यांना त्यांच्या पद्धतीनेच उत्तर दिले जाईल.- संजय भोईर, स्थायी समिती सभापती 

टॅग्स :thaneठाणेcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस