मुंब्रा येथील इमारतीच्या चौथ्या मजल्यावर सिलेंडरचा स्फोट, आगीत दोघे जखमी
By कुमार बडदे | Updated: October 4, 2023 23:14 IST2023-10-04T23:14:23+5:302023-10-04T23:14:56+5:30
गॅस लिकेज होत असल्याचा अंदाज आल्याने घरातील व्यक्ती सिलेंडरपासून दूर गेल्याने ते थोडक्यात बचावल्याची माहिती एका स्थानिक रहिवाशाने लोकमतला दिली.

मुंब्रा येथील इमारतीच्या चौथ्या मजल्यावर सिलेंडरचा स्फोट, आगीत दोघे जखमी
कुमार बडदे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंब्राः दिवा शहरातील साबे गावातील सीताबाई निवास या इमारतीच्या चौथ्या माळ्यावरील एका रुममध्ये बुधवारी रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास स्वयंपाक सुरु आसताना गँस सिलेंडरचा स्फोट झाला. यानंतर या रुममध्ये आग लागली. या आगीत दोन जण जखमी झाले.
शांतीलाल सोलंकी आणि प्रेरणा तांबे अशी जखमीची नावे आसल्याची माहिती स्थानिकांनी दिली. हे दोघे जण १०० टक्के भाजल्याची माहिती देण्यात आली आहे. जखमी अवस्थेतील दोघांना उपचारांसाठी त्यांना कळवा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, अग्निशमन दलाचे जवान रात्री उशिरा पर्यत आग विझवण्याचे प्रयत्न करत होते, अशी माहिती ठामपाच्या अप्तकालिन कक्षातील अधिका-यांनी दिली.अग्निशमन दलाचे जवान उशिरा पर्यत आग विजवण्याचा प्रयत्न करत होते.
गॅस लिकेज होत असल्याचा अंदाज आल्याने घरातील व्यक्ती सिलेंडरपासून दूर गेल्याने ते थोडक्यात बचावल्याची माहिती एका स्थानिक रहिवाशाने लोकमतला दिली.