उल्हासनगरात बेकरीत सिलेंडरचा स्फोट, बेकरी जळून खाक

By सदानंद नाईक | Updated: April 16, 2023 19:02 IST2023-04-16T19:02:29+5:302023-04-16T19:02:29+5:30

उल्हासनगर : कॅम्प नं-३ शांतीनगर स्मशानभूमी येथील बेग झो या बेकरीत शनिवारी रात्री साडे बारा वाजता सिलेंडरचा स्फोट होऊन ...

Cylinder blast in bakery in Ulhasnagar, bakery burnt down | उल्हासनगरात बेकरीत सिलेंडरचा स्फोट, बेकरी जळून खाक

उल्हासनगरात बेकरीत सिलेंडरचा स्फोट, बेकरी जळून खाक

उल्हासनगर : कॅम्प नं-३ शांतीनगर स्मशानभूमी येथील बेग झो या बेकरीत शनिवारी रात्री साडे बारा वाजता सिलेंडरचा स्फोट होऊन बेकरीला आग लागली. सुदैवाने कामगार जेवायला बाहेर गेल्याने, कोणतीही जीवितहानी झाली नाही. 

उल्हासनगर शांतीनगर स्मशानभूमी येथे बेग झो नावाची बेकरी असून,  शनिवारी रात्री साडे बारा वाजता सिलेंडरचा स्फोट होऊन बेकरीला आग लागली. याप्रकारने परिसरात हडकंप उडून शेकडो नागरिक रस्त्यावर आले. अग्निशमन विभागाचे जेवण आग विझवीत असतांना पुन्हा एका सिलेंडरचा स्फोट झाला. आग विझवितांना अग्निशमन दलाच्या जवानांनी जळत्या बेकरीतून दोन सिलेंडर बाहेर काढले. तर त्यापूर्वी स्थानिक नागरिकांनी दोन सिलेंडर बाहेर काढल्याची माहिती अग्निशमन विभागाचे प्रमुख बाळू नेटके यांनी दिली. काही तासात बेकरीची आग आटोक्यात आणली असून आगीत लाखोंचे साहित्य जाळून खाक झाले. सुदैवाने बेकरीत काम करणारे १५ कामगार जेवण्यासाठी बेकरी बाहेर आल्याने, त्यांचा जीव वाजला आहे. अधिक तपास मध्यवर्ती पोलीस करीत आहेत.

Web Title: Cylinder blast in bakery in Ulhasnagar, bakery burnt down

टॅग्स :fireआग