उल्हासनगरात पार पडली सायक्लोथॉन स्पर्धा; महापालिका आयुक्तासह अनेकांचा स्पर्धेत भाग
By सदानंद नाईक | Updated: March 26, 2023 17:23 IST2023-03-26T17:22:48+5:302023-03-26T17:23:06+5:30
रविवारी सकाळी ७ वाजता शांतीनगर छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार पासून सायक्लोथॉन स्पर्धेची सुरवात झाली.

उल्हासनगरात पार पडली सायक्लोथॉन स्पर्धा; महापालिका आयुक्तासह अनेकांचा स्पर्धेत भाग
उल्हासनगर : पर्यावरण विषयी जनजागृतीसाठी महापालिकेने रविवारी सकाळी ७ वाजता सायक्लोथॉन स्पर्धेचे आयोजन केले. स्पर्धेत महापालिका आयुक्त अजीज शेख यांच्यासह अधिकारी व कर्मचारी, शहर पोलीस, वाहतूक पोलीस आदीसह नागरिकांनी सहभाग नोंदविला असून यावेळी पर्यावरण बाबत शपथ घेतली.
उल्हासनगर महापालिका आयुक्त अजीज शेख यांच्या संकल्पनेतून पर्यावरण जनजागृती बाबत उपायुक्त सुभाष जाधव, पर्यावरण विभाग प्रमुख विशाखा सावंत यांनीं रविवारी सायक्लोथॉन स्पर्धेचे आयोजन केले. रविवारी सकाळी ७ वाजता शांतीनगर छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार पासून सायक्लोथॉन स्पर्धेची सुरवात झाली. तर साई बाबा मंदिर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार येथे समाप्त झाली.
स्पर्धेला सुरवात होण्यापूर्वी उपस्थितांना पर्यावरण सरंक्षण बाबत पर्यावरण विभाग प्रमुख विशाखा सावंत यांनी शपथ दिली. स्पर्धेत महापालिका आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर, उपायुक्त सुभाष जाधव, लेखा अधिकारी किरण भिलारे, विशाखा सावंत, राजेश घनघाव यांच्यासह शहर पोलीस, वाहतूक पोलीस, विविध सामाजिक संस्थेचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सहभागी व विजेत्या स्पर्धकांचे प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला.