Cyclone Tauktae : ठाण्यात अनेक ठिकाणी पावसामुळे पडझड, जनजीवन विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 07:48 PM2021-05-17T19:48:22+5:302021-05-17T19:49:10+5:30

Cyclone Tauktae : दिवसभरात १६२.९३ मीमी पावसाची नोंद शहरात झाली. तर सततच्या वाऱ्यामुळे शहरातील अनेक भागांचा वीज पुरवठा खंडीत देखील झाला होता. तसेच तीन ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

Cyclone Tauktae : Rains in many places in Thane, disrupted public life | Cyclone Tauktae : ठाण्यात अनेक ठिकाणी पावसामुळे पडझड, जनजीवन विस्कळीत

Cyclone Tauktae : ठाण्यात अनेक ठिकाणी पावसामुळे पडझड, जनजीवन विस्कळीत

Next
ठळक मुद्देसोमवारी दिवसभर सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शहराच्या विविध भागात 59 वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या. यामध्ये काही वाहनांसह घरांचेही नुकसान झाले.

ठाणे : चक्रीवादळाचा फटका ठाण्यालाही बसल्याचे दिसून आले आहे. शहरात रात्रीपासून वाऱ्यासह पावसाला दमदार सुरवात झाली. सोमवारी दिवसभर सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शहराच्या विविध भागात 59 वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या. यामध्ये काही वाहनांसह घरांचेही नुकसान झाले. तर काही ठिकाणी वृक्षाच्या फांद्यादेखील पडल्याच्या घटना घडल्या. सुदैवाने यात जीवतहानी झाली नसली तरी वाहनांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आले आहे. शहरातील दोन ठिकाणी दोन इमारतींचे स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे. परंतु यात कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झालेली नाही. तर दिवसभरात १६२.९३ मीमी पावसाची नोंद शहरात झाली. तर सततच्या वाऱ्यामुळे शहरातील अनेक भागांचा वीज पुरवठा खंडीत देखील झाला होता. तसेच तीन ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

तौत्के चक्रीवादाळाचा तडाखा रविवारी रात्री पासून ठाणे  शहराला देखील बसल्याचे दिसून आले. रात्रीपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह रिमझिम पडणाऱ्या पावसाने सोमवारी दमदार हजेरी लावल्याचे दिसून आले. दिवसभर मुसळधार बरसणाऱ्या  या पावसाने हवेत गारवा निर्माण झाला होता. तर रस्त्यावरील वाहतूक मंदावल्याचे चित्र दिसत होते. एकूणच सततच्या पडणाऱ्या  या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसून आले. वारा दिवसभर सुरु असल्याने शहरातील अनेक भागांचा खासकरून झोपडपटटी भागांचा वीज पुरवठा खंडीत झाल्याचे दिसून आले. सुदैवाने एवढा पाऊस होऊनही कुठेही पाणी साचण्याच्या घटना घडल्या नाहीत. वृक्ष पडण्यामध्ये वाहनांचे तसेच काही घरांचे देखील नुकसान झाले आहे. सकाळी रिमझिम पडणाऱ्या पावसाने दुपारी जोरदार बरसण्यास सुरवात केली. त्यामुळे शहरात संपूर्ण काळोख झाल्याचे दिसत होते. तर सांयकाळी देखील पावसाचा आणि वाऱ्याचा जोर ओसरल्याचे दिसून आले नाही.

दुसरीकडे, रात्री पासून शहराच्या विविध भागात वृक्ष पडल्याची घटना घडल्या आहेत. खारेगाव ओझन व्हॅली, कोपरी मिठबंदर रोड येथे वृक्ष महापालिकेच्या स्ट्रीट लाईट पोलवर पडला त्यामुळे पोलही खाली पडला. के .व्हीला येथे नारळाचे झाड दुस:या झाडावर पडून दोनही वृक्ष खाली पडले. कन्हया नगर कोपरी येथे दोन रिक्षांवर झाड पडले, आदर्श चाळ येथे एका घरावर वृक्ष पडला, सुदैवाने यात कोणत्याही स्वरुपाची जिवीतहानी झाली नाही, कळवा राज पार्क येथे उभ्या असलेल्या चारचाकीवर, शिवाजी पथ, कळवा रेल्वे कॉलनी जवळ दोन वाहनांवर, कळवा दत्त वाडी येथे एक वृक्ष टोरेन्ट कंपनीच्या विद्युत वाहीनीवर पडल्याने या भागाचा वीज पुरवठा खंडीत झाला होता. वागळे इस्टेट येथेही वृक्ष पडल्याची घटना घडली, मानपाडा येथील चितळसर पोलीस स्टेशन जवळ देखील वृक्ष पडल्याची घटना घडली. 

गोकुळ नगर, साकेत रोड, लुईसवाडी, राबोडी, वागळे इस्टेट, कशिश पार्क, कासारवडवली, कोठारी कंपाऊंड, सरोवर दर्शन, विश्वकर्मा नगर, तिनहात नाका सिग्नल, काजुवाडी, पसायदान सोसायटी पाचपाखाडी, टेकडी बंगला, मनोरमा नगर, तुळशीधाम, घंटाळी, रिक्षा देखील बाबुभाई पेट्रोल पंपाच्या ठिकाणी वृक्ष पडले. तर तब्बल २१ ठिकाणी वृक्षाच्या फांद्या पडल्याच्या घटना घडल्या आहेत. बी कॅबीन येथील घरावर, उपवन, रनपिसे चाळतील दोन घरांवर झाडाच्या फांद्या पडल्या. आनंद नगर कोपरी, स्वामी समर्थ मठ कोपरी, मनोरुग्णालयाजवळ मोठी फांदी महापालिकेच्या स्ट्रीट लाईट पोलवर पडली, गावदेवी मंदीर कोपरी, शिवाजी नगर कळवा, तुलसीधाम, परबवाडी येथे एका वाहनावर फांदी पडली, कामगार केंद्र कोपरी, घंटाळी देवी मंदिराजवळही एका वाहनावर फांदी पडल्याची घटना घडली. तर मुस रोड येथेही फांदी पडल्याची घटना घडली. आदींसह शहराच्या इतर भागातही वृक्षाच्या फांद्या पडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तर शहरातील तीन ठिकाणाहून ठाणो महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला वृक्ष धोकादायक स्थितीत आल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.

तीन ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना
चक्रीवादाळामुळे झालेल्या पावसाने ठाण्यातील तीन ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यामध्ये कोरम मॉल जवळील नितिन कंपनी, उजिर्ता हॉटेल, कोर्टनाका आणि अपना नगर राबोडी महापालिका शाळेजवळ पाणी साचल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

नालेसफाईची पोलखोल
यंदा कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर ठाणे महापालिकेच्या माध्यमातून नालेसफाईची कामे उशिराने सुरु झाली. वास्तविक पाहता आतार्पयत ७० टक्याहून अधिक कामे होणे अपेक्षित होते. परंतु ती न झाल्याने ठाणो महापालिकेच्या नाल्यातील पाणी रस्त्यावर वाहतांना दिसत होते. मुंब्य्रात तर अमृत नगर, स्टेशन परिसरातून जाणाऱ्या नाल्यातील पाणी थेट रस्त्यावर आल्याने रस्त्यालाच नाल्याचे स्वरुप प्राप्त झाल्याचे दिसत होते. तर काही ठिकाणी रस्त्यावर उभ्या असलेली वाहनांमध्येही हे पाणी शिरुन वाहने वाहतांना दिसत होती. तर शहरातील इतर ठिकाणी देखील नाल्यांची अशीच काहीशी अवस्था दिसून आली. महापालिकेने नालेसफाई न केल्याने पावसाच्या पाण्याचेच नाल्यांची सफाई करुन पालिकेची पोलखोल केल्याचे दिसून आले.

वृक्ष अधिकारी खैरे यांच्यावर तत्काळ कारवाई करण्याची मागणी 
पावसाळ्यापूर्वी वृक्षाच्या फांद्या कापणे गरजेचे असतांना महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाकडून तशी कारवाई होतांना दिसली नाही. त्यामुळे सोमवारी झालेल्या पावसात शहरभर वृक्ष उन्मळून पडले आहेत, फांद्या पडल्या आहेत. यातून अनेक वाहनांचे, घरांचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे याला सर्वस्वी जबाबदार असलेल्या वृक्ष अधिकारी खैरे यांच्यावर तत्काळ कारवाई करण्याची मागणी सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत माजी सभापती राम रेपाळे यांनी केली. त्याला राष्ट्रवादीचे नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी अनुमोदन दिले. त्यानुसार स्थायी समिती सभापती संजय भोईर यांनी देखील त्यांच्यावर कारवाई करुन त्यांच्या पुन्हा केदार पाटील यांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले.

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या गेटचे नुकसान 
ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचा गेट देखील या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसापासून वाचू शकलेला नाही, या गेटवर असलेली कमानच गेटवर पडून कमान आणि गेटचे नुकसान झाल्याचे दिसून आले.

मांसुदा तलावाजवळ वृक्ष उन्मळून पडल्याचे दिसून आले 
मांसुदा तलावा जवळ काही दिवसांपूर्वी वृक्ष पडून झालेल्या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर येथील ३५ वृक्ष हे धोकादायक असल्याची माहिती समोर आली होती. विद्युत वाहिनी टाकतांना हे वृक्ष धोकादायक झाल्याचा ठपका वृक्ष प्राधिकरण विभागाने विद्युत विभागाकडे बोट दाखविले होते. या आरोपातून विद्युत विभागाने आपले हात झटकत ही जबाबदारी हा ठपका फेटाळून लावला होता. परंतु पालिकेच्या या दोन विभागातील वादाचा फटका आता बसला आहे. सोमवारी झालेल्या मुसळधार पावसात या परिसरातील आणखी वृक्ष उन्मळून पडल्याचे दिसून आले.

Web Title: Cyclone Tauktae : Rains in many places in Thane, disrupted public life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.