शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

लैंगिक छळवणूक प्रकरणी कार्पोरेट कंपनीच्या अधिकाऱ्याला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 19:53 IST

पूर्वीप्रमाणेच आपल्याशी मैत्रि करावी, अशी गळ घालीत आपल्या सहकारी महिलेशी अश्लील वर्तन करीत तिच्या पतीलाही ठार मारण्याची धमकी देणाºया अभिशेषकुमार शर्मा याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने बुधवारी अटक केली आहे.

ठळक मुद्दे कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हाठाणे गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाईपतीलाही ठार मारण्याची दिली धमकी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: सहकारी महिलेची लैंगिक छळवणूक करुन तिला अश्लील मेसेज आणि फोटो पाठवून तिच्या पतीला ठार मारण्याची धमकी देणा-या अभिशेषकुमार शर्मा (३८, रा. बाळकूम, ठाणे) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट १ ने बुधवारी रात्री अटक केली आहे. त्याला १ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.ठाण्यातील एका नामांकित कंपनीमध्ये हे दोघेही नोकरीला असून शर्मा या कंपनीमध्ये उच्च पदस्थ अधिकारी आहे. आधी त्यांच्यात चांगली मैत्रीही होती. त्याच्या विचित्र वागणूकीमुळे आणि ‘अपेक्षे’मुळे या महिलेने त्याच्याशी मैत्री तोडली होती. तिने पुन्हा पूर्वीप्रमाणेच त्याच्याशी मैत्रिचे संबंध ठेवावेत. यासाठी त्याच्या वेगवेगळया मोबाईल फोनवरुन त्याने तिच्या मोबाईलवर वारंवार फोन केले. तसेच तिच्या मेल आयडी आणि व्हॉटसअ‍ॅपवर मेसेज करुन तिला तसेच तिचे पती, आई, सासू, सासरे, नणंद आदींना शिवीगाळ केली. कहर म्हणजे तिच्या पतीलाही ठार मारण्याची धमकी देऊन तिला अश्लील मेसेज आणि फोटो पाठवून तिची आणि तिच्या कुटूंबाची बदनामी करण्याची धमकी दिली. प्रचंड मन:स्ताप झाल्याने या महिलेने अखेर कासारवडवली पोलीस ठाण्यात याप्रकरणी २९ नोव्हेंबर २०१८ रोजी तक्रार दाखल केली. त्याच्याविरुद्ध विनयभंग, शिवीगाळ करणे, धमकी देणे तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आले असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितिन ठाकरे हे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंग