इगतपुरीजवळ रुळाला तडे, मरेची वाहतूक उशिराने
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2019 10:54 IST2019-07-23T10:53:32+5:302019-07-23T10:54:33+5:30
इगतपुरी स्थानकात फलाट क्रमांक 3 वर रेल्वे रुळाला तडे गेल्याची समस्या झाली होती

इगतपुरीजवळ रुळाला तडे, मरेची वाहतूक उशिराने
डोंबिवली: इगतपुरी स्थानकात फलाट क्रमांक 3 वर रेल्वे रुळाला तडे गेल्याची समस्या झाली होती, त्यामुळे मनमाड इथून येणाऱ्या पंचवटी, राज्यराणी एक्स्प्रेस काही काळ स्थानकात थांबल्या होत्या, पण नुकतीच ती समस्या सुटली असून, गाड्या मुबंईच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती अभियंता विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. त्या घटनेमुळे मनमाड, नासिक आदी ठिकाणाहून येणाऱ्या शासकीय, नीमशासकीय, व्यापारी तसेच विदयार्थी आदींना काहीसा लेट झाला असल्याने प्रवाशांमध्ये अस्वस्थता होती.