शिव मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 00:16 IST2019-08-06T00:16:27+5:302019-08-06T00:16:33+5:30

सकाळी ६ वाजल्यापासून भाविकांनी दर्शनरांगेत उभे राहून महादेवाचे दर्शन

Crowds to meet devotees at Shiva temple | शिव मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी

शिव मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी

अंबरनाथ : अंबरनाथच्या प्राचीन शिव मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. सकाळी ६ वाजल्यापासून भाविकांनी दर्शनरांगेत उभे राहून महादेवाचे दर्शन घेतले. जोरदार पाऊस असतानाही भाविकांचा उत्साह किंचितही कमी झाला नाही. श्रावणातला पहिला सोमवार असल्याने भाविकांनी गर्दी केली होती. याठिकाणी पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.

अंबरनाथमधील प्राचीन शिव मंदिरात श्रावणी सोमवारनिमित्त भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. लांबलचक रांग मंदिर परिसरात लावण्यात आली होती. पावसाचा जोर जास्त असतानाही भाविक छत्री घेऊन रांगेत उभे होते. मंदिराच्या गाभाऱ्यात भाविकांची गर्दी आवरण्यासाठी स्वयंसेवकही यावेळी हजर होते. मंदिराच्या परिसरात श्रावण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिराच्या पुजारी कुटुंबीयांपैकी विजय पाटील यांनी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

Web Title: Crowds to meet devotees at Shiva temple