सहा बांधकामे तोडून दोघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:30 IST2021-07-17T04:30:13+5:302021-07-17T04:30:13+5:30

ठाणे : ठाणे महापालिकेने शुक्रवारी दिवा प्रभाग समितीमधील सहा वाढीव अनधिकृत बांधकामे तोडून दोघांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल केला. ...

Crime on two by breaking six constructions | सहा बांधकामे तोडून दोघांवर गुन्हा

सहा बांधकामे तोडून दोघांवर गुन्हा

ठाणे : ठाणे महापालिकेने शुक्रवारी दिवा प्रभाग समितीमधील सहा वाढीव अनधिकृत बांधकामे तोडून दोघांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल केला.

यात फय्याज मुस्ताक खान ऊर्फ ऊमर खान यांच्या आचारगल्ली शीळफाटा येथील तळ व्याप्त असलेल्या दुसऱ्या मजल्यावरील एकूण ३२ आरसीसी कॉलम तोडले. तर दोस्ती कॉम्प्लेक्सच्या मागील बाजूस खर्डी येथील आरीफ सुर्ति आणि भोलेनाथ नगरमधील रफाद रशीद खान यांचे वाढीव अनधिकृत बांधकाम तोडले. तसेच माजिवडा मानपाडा प्रभाग समिती, नौपाडा प्रभाग समिती आणि कळवा प्रभाग समितीमधील प्रत्येकी एक वाढीव अनधिकृत बांधकामे जमिनदोस्त केले. यात फय्याज मुस्ताक खान आणि रफाद रशीद खान यांच्याविरुद्ध मुंब्रा पोलीस स्टेशन येथे फौजदारी गुन्हा दाखल केला.

Web Title: Crime on two by breaking six constructions