Crime News: उल्हासनगरात तरुणाला मारहाण करून दुचाकीचे नुकसान, गुन्हा दाखल
By सदानंद नाईक | Updated: February 17, 2023 16:23 IST2023-02-17T16:22:51+5:302023-02-17T16:23:18+5:30
Ulhasnagar News: मोटरसायकलच्या पेट्रोल टाकीला छेडछाड करण्याचा जाब विचारताच हम जेल काट के आये है, इधरही काट डालुंगा अशी धमकी देऊन तरुणाला दोघांनी मारहाण केली.

Crime News: उल्हासनगरात तरुणाला मारहाण करून दुचाकीचे नुकसान, गुन्हा दाखल
- सदानंद नाईक
उल्हासनगर - मोटरसायकलच्या पेट्रोल टाकीला छेडछाड करण्याचा जाब विचारताच हम जेल काट के आये है, इधरही काट डालुंगा अशी धमकी देऊन तरुणाला दोघांनी मारहाण केली. तसेच दुचाकीवर दगड टाकून नुकसान केले असून याप्रकरणी विट्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
उल्हासनगर कॅम्प नं-४ दुलारीपाडा कृष्णा मॅरेज हॉल येथे राहुल शंकर सोनावणे याने गुरवारी रात्री ११ वाजता मोटरसायकल उभी केली होती. यावेळी आयुष्य संजय राय व बाबू उर्फ पेंटर हे दोघे मोटरसायकलच्या पेट्रोल टाकीला छेडछाड करीत असल्याचे राहुलच्या लक्षात आले. त्याने याबाबत दोघाला हटकताच त्यांनी आम्ही जेल मधून आलो असून तुला कापून टाकू. अशी धमकी देत चाकू दाखवून मारहाण केली. तसेच दगड मोटरसायकलवर टाकल्याने, गाडीचे नुकसान झाले. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात आयुष्य राय व बाबू उर्फ पेंटर या दोघांवर गुन्हा दाखल केला. पोलीस अधिक तपास करीत आहेत. दरम्यान शहरात गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ झाली असून पोलीसही हैराण झाले आहेत.