Crime News: बॅग न दिल्याने, गाडी पळविली
By सदानंद नाईक | Updated: August 29, 2023 17:25 IST2023-08-29T17:23:59+5:302023-08-29T17:25:12+5:30
Crime News: कॅम्प नं-३ परिसरात राहणारे व्यावसायिक दिनेश आहुजा हे ऍक्टिव्ह गाडीने सोमवारी रात्री १० वाजता काजल पेट्रोल पंप मार्गे घरी जात होते.

Crime News: बॅग न दिल्याने, गाडी पळविली
- सदानंद नाईक
उल्हासनगर - कॅम्प नं-३ परिसरात राहणारे व्यावसायिक दिनेश आहुजा हे ऍक्टिव्ह गाडीने सोमवारी रात्री १० वाजता काजल पेट्रोल पंप मार्गे घरी जात होते. त्यावेळी छोटु उर्फ अजित नावाच्या तरुणाने त्यांच्याकडील बॅग हिसकविण्याचा प्रयत्न फसल्यावर ऍक्टिव्हा गाडी घेऊन पोबारा केल्याची घटना घडली आहे.
उल्हासनगरातील व्यावसायिक दिनेश किसनचंद आहुजा हे कॅम्प नं-३, काजल पेट्रोल पंप मार्गे सोमवारी रात्री १० वाजता ऍक्टिव्हा गाडीने घरी जात होते. त्यावेळी भर रस्त्यात छोटु उर्फ अजित याने आहुजा यांची गाडी अडवून रस्त्यावर पाडून दिली. तसेच त्यांच्यासी झटपट करीत बॅग हिसकविण्याचा प्रयत्न केला. मात्र बॅग हिसकविण्यात अयशस्वी झाल्यावर, त्याने ऍक्टिव्हा गाडी घेऊन पोबारा केला. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात छोटु उर्फ अजित याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.