शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे महापालिकेचे उपायुक्त विश्वनाथ केळकर यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2021 23:25 IST

कोरोना रु ग्णालयातील ३८ वर्षीय माजी कर्मचारी महिलेने दिलेल्या तक्र ारीच्या आधारे ठाणे महापालिकेचे उपायुक्त विश्वनाथ केळकर यांच्याविरोधात बुधवारी कापूरबावडी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्देकेळकर यांनी आरोप फेटाळलाकापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कोरोना रु ग्णालयातील ३८ वर्षीय माजी कर्मचारी महिलेने दिलेल्या तक्र ारीच्या आधारे ठाणे महापालिकेचे उपायुक्त विश्वनाथ केळकर यांच्याविरोधात बुधवारी कापूरबावडी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे सांगत केळकर यांनी मात्र आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत.ठाणे महापालिकेच्या बाळकूम येथील ग्लोबल कोरोना रु ग्णालयात पिडीत महिलेची कंत्राटी पद्धतीने परिचारक म्हणून भरती झाली होती. त्यावेळी उपायुक्त केळकर यांच्याकडे या रु ग्णालयाचा कारभार होता. काही महिन्यांपूर्वी रु ग्णालयात काम करतांना केळकर यांनी विनयभंग केल्याचा आरोप महापालिका प्रशासनाकडे तसेच विशाखा समितीकडे केला होता. त्यानंतर कागदपत्रे अपूर्ण असल्याचे कारण देत महापालिका प्रशासनाने या महिलेला कामावरून काढले. याची माहिती भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांना मिळाल्यानंतर त्यांनी बुधवारी ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांची भेट घेतली. तसेच केळकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर त्यांच्या विरोधातील कारवाईला वेग आला. बुधवारी सायंकाळी पिडीत तरुणीने कापूरबावडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्र ारीच्या आधारे हा गुन्हा दाखल झाला आहे.*आरोपांमध्ये तथ्य नाही- केळकरकायद्यांतर्गत विशाखा समितीसमोर या प्रकरणाची सुनावणी सुरु आहे. या कायद्यामध्ये सुनावणीतील तथ्यांविषयी कोणतीही माहिती उघड करता येत नाही. त्यामुळे सध्या कोणतीही माहिती देऊ शकत नाही. विशाखा समिती समोरील चौकशीत आणि पोलीस तपासात मी निर्दोष असेल, याची खात्री आहे. हे सर्व आरोप दृष्टबुद्धीने केले आहे. यात काहीही तथ्य नसल्याचा दावा उपायुक्त विश्वनाथ केळकर यांनी केला आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंग