शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

Crime: मोखाड्यातील ड्रग्सचा काराखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ३७ कोटींचे ड्रग्स जप्त, ७ जण अटकेत

By धीरज परब | Updated: October 23, 2023 22:50 IST

Crime News: ठाणे जिल्ह्यातील भाईंदरच्या लॉज मधून मेफेड्रोन अमली पदार्थाच्या २५ लाखांच्या साठ्यासह चौघांना १८ ऑक्टोबर रोजी अटक केल्या नंतर मीरा भाईंदर गुन्हे शाखा १ च्या पथकाने तपासाच्या आधारे पालघर जिल्ह्यातील मोखाडा येथे अमली पदार्थ बनवण्याची प्रयोगशाळाच शोधून काढली .

मीरारोड - ठाणे जिल्ह्यातील भाईंदरच्या लॉज मधून मेफेड्रोन अमली पदार्थाच्या २५ लाखांच्या साठ्यासह चौघांना १८ ऑक्टोबर रोजी अटक केल्या नंतर मीरा भाईंदर गुन्हे शाखा १ च्या पथकाने तपासाच्या आधारे पालघर जिल्ह्यातील मोखाडा येथे अमली पदार्थ बनवण्याची प्रयोगशाळाच शोधून काढली . पोलिसांनी आता पर्यंत या गुन्ह्यात एकूण  ७ जणांना अटक केली असून  ३६ कोटी ९० लाखांच्या एमडी सह वाहने, पिस्तूल , काडतुसे आदी जप्त केल्याची माहिती पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली . पोलीस आयुक्तालयातली आता पर्यंतची सर्वात मोठी अमली  पदार्थ विरोधातील कारवाई असून पालघर जिल्ह्यातून उघडकीस आलेला पहिला अमली पदार्थ बनवणारा कारखाना आहे . 

मीरा भाईंदर - वसई विरार पोलिसांच्या गुन्हे शाखा १ चे निरीक्षक अविराज कुराडे , सहायक निरीक्षक प्रशांत गांगुर्डे , कैलास टोकले व पुष्पराज सुर्वे सह संजय शिंदे , राजू तांबे , संदीप शिंदे , संतोष लांडगे , पुष्पेंद्र थापा , विजय गायकवाड , सचिन सावंत , सचिन हुले , समीर यादव , प्रशांत विसपुते यांच्या पथकाने बुधवार १८ ऑक्टोबर रोजी भाईंदर पूर्वेच्या बाळाराम पाटील मार्गावरच्या विन्यासा रेसिडेन्सी लॉज मध्ये छापा टाकला होता .  प्रशांत गांगुर्डे यांच्या माहिती वरून टाकलेल्या धाडीत एका खोलीतून सनी भरत सालेकर ( २८ ) बोरिवली पश्चिम ;  विशाल सतीश गोडसे ( २८ ) कळंबोली  ; शहाबाज शेवा ई  ( २९) व दीपक जितेंद्र दुबे ( २६ ) दोघेही दहिसर ह्या चौघांना अटक केली  होती . 

त्यांच्या कडून २५ लाख १७ हजार किमतीचे मेफेड्रोन सह रोख ,  पिस्तूल , जिवंत काडतूस,  मोबाईल , वाहने असा एकूण २६ लाख ९३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला होता . सदर एमडी तन्वीर निसार अहमद चौधरी ( ३३ ) रा . न्यू लवलेश एन्क्लेव्ह , गोल्डन नेस्ट,  भाईंदर याच्या कडून विक्री साठी घेतल्याचे  तर चौधरी याच्या चौकशीत गौतम गुनाधर घोष ( ३३ ) रा . आनंद एन्क्लेव्ह , आरबीके ग्लोबल शाळे जवळ , इंद्रलोक फेस ६ , भाईंदर पूर्वह्याने एमडी पुरवल्याचे समोर आले . पोलिसांनी दोघांना २१ ऑक्टोबर रोजी अटक केली . 

घोष कडे कसून विचारणा केल्यावर त्याने समीर चंद्रशेखर पिंजार ( ४५ ) रा . नादब्रह्म, भास्कर आळी , वसई याचे नाव सांगितले . पोलिसांनी समीर ह्याला ताब्यात घेतले असता त्याने तर अमली पदार्थ बनवण्याची प्रयोगशाळाच उभारल्याचे उघडकीस आले . पालघरच्या मोखाडा येथील समीरच्या फार्महाउस वर धाड टाकून तेथील प्रयोगशाळा उध्वस्त केली . सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर असलेला समीर हा फार्महाउस वर रासायनिक द्रव्य व पावडर वर प्रक्रिया करून एमडी बनवून घोष याच्या मार्फत विक्री करत होता . गेल्या दिड वर्षां पासून तो हा कारखाना चालवत होता . पोलिसांनी तेथून १८ किलो १०० ग्रॅम एम.डी. तसेच एम.डी. तयार करण्यासाठी लागणारे रसायन व उपकरणे जप्त केली आहेत.

पोलिसांनी ह्या कारवाईत आता पर्यंत  ३६ कोटी ९० लाख ७४ हजारांचे १८ किलो ४५३ ग्रॅम   मेफेड्रोन ;  २ लाख ७४ हजारांचे मॅफेड्रॉन बनवण्यासाठीचे रसायन ; २ लाख ६० हजारांची यंत्र सामुग्री ; ७ लाख ८० हजारांची गुन्ह्यात वापरलेली वाहने ; २ गावठी पिस्टल, ४ मॅगझिन व १४ जिवंत काडतूस असा  मुद्देमाल जप्त केला आहे. घोष वर १ गुन्हा दाखल असून त्याचा इम्पोर्ट एक्स्पोर्टचा व्यवसाय आहे . सनी सालेकर हा कुख्यात गुंड असून दहिसर - बोरिवली भागात त्याच्यावर १८ गुन्हे ;  विशाल गोडसे वर ४ ; दीपक दुबे वर ९ ; शहाबाज वर ३ गुन्हे दाखल असल्याचे उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी सांगितले . गुन्ह्याचा पुढील तपास प्रशांत गांगुर्डे करत आहेत . 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीpalgharपालघरPoliceपोलिस