अन्नधान्य विक्री प्रकरणी दोघांवर गुन्हा, शिधावाटप दुकानात काळाबाजार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2020 05:48 PM2020-12-29T17:48:47+5:302020-12-29T17:50:16+5:30

उल्हासनगर कॅम्प नं-२ आझादनगर येथील शिधावाटप दुकान क्रं-४० एफ-२५१ चे दुकानदार शारदा गायकवाड व अशोक गायकवाड हे धान्याचे वाटप शिधावाटप पत्रिका धारकांना न करता, धान्याचा काळाबाजार केला जातो.

Crime against both in food grain sale case, black market in ration shop in ulhasnagar | अन्नधान्य विक्री प्रकरणी दोघांवर गुन्हा, शिधावाटप दुकानात काळाबाजार

अन्नधान्य विक्री प्रकरणी दोघांवर गुन्हा, शिधावाटप दुकानात काळाबाजार

googlenewsNext
ठळक मुद्देउल्हासनगर कॅम्प नं-२ आझादनगर येथील शिधावाटप दुकान क्रं-४० एफ-२५१ चे दुकानदार शारदा गायकवाड व अशोक गायकवाड हे धान्याचे वाटप शिधावाटप पत्रिका धारकांना न करता, धान्याचा काळाबाजार केला जातो.

सदानंद नाईक 

उल्हासनगर : शिधावाटप दुकानातील धान्य शिधापत्रिका धारकांना न देता, धान्याची विक्री काळाबाजारात केल्याचा प्रकार उघड झाला. याप्रकरणी शिधा वाटप निरीक्षकाच्या तक्रारीवरून दोघांवर उल्हासनगर पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल केला. 

उल्हासनगर कॅम्प नं-२ आझादनगर येथील शिधावाटप दुकान क्रं-४० एफ-२५१ चे दुकानदार शारदा गायकवाड व अशोक गायकवाड हे धान्याचे वाटप शिधावाटप पत्रिका धारकांना न करता, धान्याचा काळाबाजार केला जातो. अशा तक्रारी व माहिती शिधावाटप कार्यालयाला मिळाली होती. त्यानुसार शिधावाटप निरीक्षक विजय राठोड यांनी सोमवारी सकाळी साडे अकरा वाजता दुकानाची झाडाझडती घेतली असता, दुकानातील धान्याचे वाटप न करता, धान्याची काळ्याबाजारात विक्री केल्याचे उघड झाले. शिधावाटप अधिकारी राठोड यांच्या तक्रारी वरून उल्हासनगर पोलीस ठाण्यात शारदा व अशोक गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल केला. याप्रकाराने शहरातील शिधावाटप दुकानाचा खरा चेहरा उघड झाला. यापूर्वी दुकानातील वजनेमापे खोटे व बनावट असल्याचे उघड झाले होते. याप्रकरणी वजन मापे विभागाने अनेक दुकानावर कारवाई केली होती. 

शहरातील शिधावाटप दुकानातील वजनमापे, धान्याचे वितरण व साठा आदींची चौकशी केलीतर, मोठा भ्रष्टाचार उघड होणार असल्याचे बोलले जाते. अनेक शिधावाटप दुकाने अन्नधान्याचे वाटप शिधापत्रिका धारकांना न करता , धान्याची काळाबाजार करीत असल्याची उघड होणार आहे. शिधावाटप कार्यालयाच्या कारवाईने शिधावाटप दुकानाचे धाबे दणाणले असून कोरोना काळात शिधावाटप दुकानदारांनी भ्रष्टाचाराचा कळस गाठल्याची टीका होत आहे

Web Title: Crime against both in food grain sale case, black market in ration shop in ulhasnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.