शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
4
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
5
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
6
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
7
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
8
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
9
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
10
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
11
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
12
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
14
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
15
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
16
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
18
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
19
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
20
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत

वृक्ष प्राधिकरण समितीवर न्यायालयाचे शिक्कामोर्तब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 12:05 AM

समितीला दिलासा; कारभार करण्याचा मार्ग अखेर झाला मोकळा

ठाणे : गेल्या दीड वर्षापासून वृक्ष प्राधिकरण समितीवर असलेली स्थगिती अखेर मंगळवारी उच्च न्यायालयाने उठवली. समिती सदस्यांच्या निवडीबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेमध्ये दोन सदस्यांच्या पात्रतेबाबत आक्षेप घेण्यात आले होते. मंगळवारी झालेल्या सुनावणीमध्ये गठीत करण्यात आलेल्या समितीला स्थगीती असल्याने कोणत्याही प्रकारचे निर्णय समितीच्या वतीने घेण्यात येत नसल्याने प्रकल्प रखडले असल्याचा युक्तिवाद करण्यात आला. त्यामुळे न्यायालयाने ही स्थगिती उठवत जी समिती महापालिकेने गठीत केली होती त्याच समितीवर शिक्कामोर्तब केले आहे.आॅक्टोबर महिन्यामध्ये वृक्ष प्राधिकरण समिती गठीत करण्यात आली. आधी सहा नगरसेवकांची निवड करण्यात आल्यानंतर ५ तज्ज्ञ आणि ५ विशेष आमंत्रित अशा १६ सदस्यांची निवड करण्यात आली. या समितीवर सदस्य निवडताना महाराष्ट्र (नागरी) वृक्ष संवर्धन कायदा १९७५ व नियम २००९ च्या निर्देशानुसार सायन्स तसेच अ‍ॅग्रीकल्चर पदवीधारक सदस्यांची निवड करणे अपेक्षित आहे. मात्र दोन वाणिज्य शाखेचे पदवीधर असलेल्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याने या समितीवर बेकायदेशीर सदस्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचा मुद्दा ठाण्यातील दक्ष नागरिक रोहित जोशी यांनी उपस्थित केला होता. वृक्ष प्राधिकरण विभागाने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात निवडलेले सदस्य शैक्षणिक अहर्तेत बसत असल्याचे नमूद केले होते. मात्र न्यायालयाने प्रत्येक सदस्यांची शैक्षणिक माहिती वृक्षप्राधिकरण विभागाला सादर करण्याचे आदेशही दिले होते. मंगळवारच्या सुनावणीमध्ये ठाणे महापालिकेच्यावतीने समितीला स्थगिती असल्याने कोणत्याही प्रकारचे निर्णय समितीच्यावतीने घेता येत नाही. त्यामुळे प्रकल्प रखडत असल्याचा युक्तीवाद करण्यात आला. त्यामुळे न्यायालयानेदेखील प्रकल्प मार्गी लागावे यासाठी स्थगिती उठवत ही समिती कायम केली आहे.समिती सदस्यांच्या अर्हतेवर होते आक्षेपसमितीसाठी आमंत्रित सदस्यांची निवड करण्यासाठी कोणताच नियम नसतानादेखील या आमंत्रित सदस्यांची निवड बेकायदेशीररित्या करण्यात आली असल्याचा मुद्दा जोशी यांनी उपस्थित केला होता. सुरु वातीला न्यायालयाने सदस्यांची निवड नियमबाह्य झाली असल्याचे निरीक्षण नोंदवले होते. समितीवर निवड करण्यात आलेल्या प्रत्येक सदस्याच्या शैक्षणिक अहर्तेबाबत शंका उपस्थित करून प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले होते.

टॅग्स :Mumbai High Courtमुंबई हायकोर्टthaneठाणे