लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: ठाण्यातील घोडबंदर रोड येथील एका इमारतीच्या २१ व्या मजल्यावरील घरातील गॅस गळतीमुळे लागलेल्या आगीमध्ये महेश कदम (३९) हे ५२ टक्के तर त्यांची पत्नी प्रिती (३५) या ५० टक्के भाजल्या आहेत. या दोघांनाही एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.भार्इंदरपाडयातील ‘पुराणिक रु मा बाली पार्क’मधील मिस्त्री सोसायटीमधील एकविसाव्या मजल्यावर कदम दाम्पत्य वास्तव्याला आहे. शनिवारी रात्री १०.१५ वाजण्याच्या सुमारास हे दाम्पत्य जेवणासाठी घरात बसले होते. त्याचदरम्यान त्यांच्या स्वयंपाकगृहातील सिलेंडरच्या रेग्यूलेटरमधून एचपी गॅसची गळती होण्यास सुरु वात झाली. त्याचवेळी घराच्या मंदिरामध्ये दिवा चालू होता. दिव्याच्या आगीशी गॅसचा संपर्क आल्याने घरात आगीचा भडका झाला. सुदैवाने, सिलिंडरचा यात स्फोट झाला नाही. परंंतू, या आगीच्या भडक्यामध्ये घराचे मालक महेश हे ५५ तर त्यांची पत्नी प्रिती या ५० टक्के भाजल्या आहेत. त्या दोघांनाही उपचारासाठी ठाण्यातील मानपाडा येथील एका खासगी रु ग्णालयात दाखल केले आहे. महेश हे गंभीररित्या जखमी झाले असून घटनास्थळी ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या पथकाने तसेच अग्निशमन दलाच्या पथकाने मदतकार्य राबविल्याचे या कक्षाचे प्रमुख संतोष कदम यांनी सांगितले.
ठाण्यात गॅस गळतीमुळे लागलेल्या आगीमध्ये दाम्पत्य होरपळून जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 21:13 IST
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाण्यातील घोडबंदर रोड येथील एका इमारतीच्या २१ व्या मजल्यावरील घरातील गॅस गळतीमुळे लागलेल्या आगीमध्ये ...
ठाण्यात गॅस गळतीमुळे लागलेल्या आगीमध्ये दाम्पत्य होरपळून जखमी
ठळक मुद्देआपत्ती व्यवस्थापन विभागाने घेतली धाव सुदैवाने मोठी हानी टळली