शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

तब्बल तीन महिन्यांच्या लॉकडाऊन हनिमूननंतर मायदेशी परतले दाम्पत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2020 12:28 AM

फिरण्याचे प्लान्स झाले रद्द; एकमेकांना जाणून घेण्यात घालवला वेळ

- प्रज्ञा म्हात्रे 

ठाणे : हनिमूनसाठी परदेशात गेलेले ठाण्यातील नवदाम्पत्य तब्बल ८७ दिवसांनी ठाण्यात परतले. तिकडे फिरण्यासाठी केलेले सगळे प्लान्स रद्द झाल्याची खंत असली, तरी कॉलेजच्या दिवसांत जितके एकमेकांना ओळखत नव्हतो, तितके या ८० दिवसांत एकमेकांना ओळखू लागलो. कोरोना नसता तर एकमेकांना समजून घेण्यासाठी इतका वेळ कधी मिळाला नसता, अशा भावना ठाण्यातील नवदाम्पत्य क्रिती आणि ध्रुव देशपांडे यांनी व्यक्त केल्या.१९ जानेवारी २०२० ला क्रिती आणि ध्रुव यांचा विवाह झाला. लग्नानंतर फिरण्यासाठी त्यांनी पेरू आणि मेक्सिकोला जाण्याचा प्लान केला. १० मार्चला निघून ४ एप्रिल रोजी भारतात परतण्याचा त्यांचा प्लान होता. १० मार्चला पेरूला जाण्यासाठी निघाल्यावर २६ तासांनी ते त्या ठिकाणी पोहोचले. त्यावेळी पेरूमध्ये कोरोनाचे रुग्ण अत्यंत कमी होते. तेथील जनजीवन सुरळीत सुरू होते. मास्क न घालता तेथील लोक फिरत होते. सहा दिवस तेथे फिरल्यावर १६ मार्चला तेथे संपूर्ण शहर बंद करण्यात आले. त्याच दिवशी भारतात परतण्यासाठी निघाले असताना विमानसेवादेखील बंद करण्यात आली. त्यावेळी त्यांनी भारतीय दूतावासाशी संपर्क केल्यावर त्यांना पेरूतून कधी निघता येईल, हे सांगता येत नव्हते, आमच्यासोबत ६० जण अडकले होते, असे ध्रुव यांनी सांगितले. त्यानंतर, कोरोनाचे सावट लवकर जाणार नाही. आॅगस्ट, सप्टेंबर उजाडेल, असे या दोघांना वाटत होते. हनिमूनबरोबरच फिरण्याचे केलेले प्लानिंग रद्द झाल्याने रिफंड मिळाल्याने पैशांची चिंता नव्हती, पण पैसे जपूनच वापरत होतो, असे दोघांनी सांगितले. इकडे त्यांचे कुटुंब ताणतणावाखाली होते आणि दुसरीकडे हे दोघेही एकमेकांना धीर देत होते.

२३ मार्च रोजी हॉटेलमधून त्यांनी लिमामधील मीरा फ्लोरेस येथे एका अपार्टमेंटमध्ये राहण्याचे ठरविले. आता सप्टेंबरपर्यंत इथेच राहावे लागेल, अशी मानसिकता दोघांनी केली होती. त्यामुळे एकमेकांसोबत वेळ घालविण्याचे हे दिवस परत कधी येणार नाही, अशी स्वत:ची समजूत काढून त्यांनी एकमेकांसाठी वेळ देण्याचे ठरविले. त्या दरम्यान जेवण बनविणे, पेरूची खाद्यसंस्कृती, छोटीमोठी कामे आणि बऱ्याच गोष्टी शिकलो असल्याचे ध्रुव यांनी सांगितले.लॉकडाऊनमध्ये शिकले बरेच काही२५ मे रोजी ते भारतात परतले. तब्बल ८० दिवसांनी मायदेशी परतल्यावर आठवडाभर मुंबई येथील एका हॉटेलमध्ये त्यांना क्वारंटाइन करण्यात आले. सात दिवसांनी त्यांची तपासणी केली असता अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना ठाण्याला जाण्याची परवानगी दिली गेली.आता सध्या आम्ही इथे येऊन होम क्वारंटाइन झालो आहोत. आता आम्ही स्वत:चे जेवण स्वत:च बनवत आहोत. ८ जूनला आमचा क्वारंटाइनचा काळ संपत आहे. लॉकडाऊन हनिमूनमुळे आम्ही बºयाच गोष्टी शिकलो आहोत. घरचेही आम्हाला तुम्ही बदलल्याचे सांगत असल्याचे ध्रुव यांनी सांगितले.क्रिती व ध्रुव यांचे फिरण्याचे प्लान रद्द झाल्याने त्यांना रिफंड मिळाला होता. परंतु, ते पैसे त्यांनी जपून वापरले.

टॅग्स :thaneठाणेmarriageलग्नcorona virusकोरोना वायरस बातम्या