शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
4
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
5
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
6
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
7
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
8
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
9
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
10
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
11
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
12
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
13
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
14
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
15
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
16
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
17
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
18
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
19
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
20
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार

व्हॉट्स अ‍ॅपवर शेवटची इच्छा शेअर करत दाम्पत्याचा चिमुरडीसह गळफास; परिसरात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2020 1:22 PM

आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत १३ जणांची नावं; चिठ्ठी व्हॉट्स व्हॉट्स अ‍ॅपवर व्हायरल

ठळक मुद्देआत्महत्येपूर्वी दाम्पत्यानं लिहिलेल्या चिठ्ठीत १३ नातेवाईकांची नावंआत्महत्येसाठी नातेवाईकांना जबाबदार धरत कठोर कारवाईची मागणीपोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले; तपास सुरू

मुंब्राः कथित जमिनीच्या वादातून दाम्प्त्याने त्यांच्या लहान मुलीसह आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. शिवराम आणि दीपिका पाटील तसंच त्यांची मुलगी अनुष्का यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार जवळील वाकलन परिसरात वास्तव्यास होते. तिघांच्या आत्महत्येची माहिती पसरताच परिसरात एकच खळबळ उडाली.पाटील यांनी आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहिली. ती चिठ्ठी त्यांनी नातेवाईकांच्या व्हॉट्सअप नंबरवर व्हायरल केली होती. जवळच्या 13 नातेवाईकांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या  करत असल्याचं त्यांनी चिठ्ठीत नमूद केलं आहे. या नातेवाईकांना कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणीदेखील त्यांनी चिठ्ठीतून केली आहे.  तिघांच्या आत्महत्येच्या नेमक्या कारणाची माहिती पोलिसांकडून अद्याप मिळालेली नाही.'कुटुंबातील इतर लोकांना त्रास देण्यासाठी आम्ही आत्महत्या करत आहोत. आमच्या आत्महत्येसाठी घरातील सगळ्यांना जबाबदार धरावं' असा मजकूर असलेली चिठ्ठी लिहून शिवराम आणि दीपिका पाटील आणि त्यांची मुलगी अनुष्का यांनी गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. आपल्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्या १३ जणांना कठोर शिक्षा व्हावी हीच आमची शेवटची इच्छा असल्याचं त्यांनी चिठ्ठीत नमूद केलं आहे. सध्या पोलीस संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. पोलिसांनी चिठ्ठी ताब्यात घेतली असून त्यात नावं नमूद असलेल्या १३ जणांना लवकरच चौकशीसाठी ताब्यात घेतलं जाण्याची शक्यता आहे. पोलिसांनी पती, पत्नी आणि मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलीस सध्या संपूर्ण घराची झडती घेत असून शेजाऱ्यांचीदेखील चौकशी करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, चिठ्ठीमध्ये मालमत्ता आणि संपत्तीचा उल्लेख करण्यात आला आहे. त्या अनुषंगानं पोलिसांनी तपास सुरू केला आहे. 

टॅग्स :Suicideआत्महत्या