कोरोना काऊन्सिलींग माध्यमातून ५०० हून अधिक ठाणेकरांचे केले समुपदेशन, ‘वुई आर फॉर यु’ या अभियानाअंतर्गत सेवा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2020 06:17 PM2020-09-13T18:17:00+5:302020-09-13T18:29:02+5:30

ठाण्यातील किरण नाकती यांनी ठाणेकरांचे कोरोना काऊन्सलींग केले आहे.

Counseling of more than 500 Thanekars through Corona Counseling | कोरोना काऊन्सिलींग माध्यमातून ५०० हून अधिक ठाणेकरांचे केले समुपदेशन, ‘वुई आर फॉर यु’ या अभियानाअंतर्गत सेवा सुरू

कोरोना काऊन्सिलींग माध्यमातून ५०० हून अधिक ठाणेकरांचे केले समुपदेशन, ‘वुई आर फॉर यु’ या अभियानाअंतर्गत सेवा सुरू

googlenewsNext
ठळक मुद्देकिरण नाकती यांनी सुरू केली कोरोना काऊन्सलींग सेवा५०० हून अधिक कोरोना बाधित आणि नातेवाईकांचे समुपदेशन ‘वुई आर फॉर यु’ या अभियानाअंतर्गत ‘कोरोना काऊंन्सिलिंग’ सुरू

ठाणे : केवळ शारिरीक कोरोनाने नव्हे तर मानसीक कोरोनाने ग्रासलेल्या ठाणेकरांना या आजारातून बाहेर काढण्यासाठी आदित्य प्रतिष्ठान, ठाणे आयोजित ‘वुई आर फॉर यु’ या अभियानाअंतर्गत ‘कोरोना काऊंन्सिलिंग’ या सेवेच्या माध्यमातून आतापर्यंत ५०० हून अधिक कोरोनाबाधित आणि त्यांच्या नातेवाईकांना समुपदेशन करण्यात आले. या समुपदेशनातून सुसंवादाने कोरोनावर मात करण्याचे बळ मिळाले असल्याच्या भावना ठाणेकरांनी व्यक्त केल्या.
         सुसंवाद नेहमीच बदल घडवत असतो. आजही संवाद खुंटत असलेल्या कोरोनाच्या या काळात एकमेकांसोबत सुसंवाद अतिशय महत्वाचा आहे. आत्मविश्वास वाढविणारा आहे. हे लक्षात घेऊन आदित्य प्रतिष्ठान, ठाणे या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष किरण नाकती यांनी ‘कोरोना काऊंन्सिलिंग’ ही सेवा सुरू केली. २४ तास सुरू असलेल्या या सेवेमुळे कोरोनाग्रस्त आणि त्यांच्या नातेवाईकांचा आत्मविश्वास वाढला. तसेच, मानसिकरित्या कोरोनावर मात करण्यासाठी याचा अनेकांना फायदा झाला. ही सेवा जास्तीत जास्त लोकांना देण्याचा मानस आहे असे नाकती यांनी लोकमतला सांगितले. शारिरीक कोरोनाचे औषधरूपी उपचार रुग्णालयात सुरू असताना दुसरीकडे मानसिक कोरोना घालवण्यासाठी ‘वुई आर फॉर यु ची’ कोरोना काऊंन्सिलिंग ही सेवा वरदान ठरत आहे अशा भावना या सेवेचा लाभ घेतलेल्या ठाणेकरांनी व्यक्त केल्या.
कोरोनाची मनात भिती असल्याने कोरोना हा मानसीक आजार झाला आहे. घरातील एखाद्या कुटुंबातील सदस्य कोरोनाग्रस्त आढळल्यास त्याचे संपूर्ण कुटुंब मानसीक ताणतणावाखाली जाते. हे सर्व पाहिल्यावर नाकती यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता कधी घरी जाऊन तर कधी रुग्णालयात जाऊन तर कधी फोनद्वारे समुपदेशन करीत आहेत. ‘वुई आर फॉर यु ला साथ देऊ या, कोरोनावर मात करू या’ असे आवाहन त्यांनी ठाणेकरांना केले आहे.
-------------------------------------------------------------------------------------------------------
कोरोना काळात आमचे सख्खे शेजारी ही आमच्या सोबत परकेपणाने वागत असताना माझ्याशी दूर दूर ही ओळख नसलेले नाकती सर अगदी आपलेसे वाटले. कोरोना कौन्सिलिंगच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या या अप्रत्यक्ष मदतीला कायम स्मरणात ठेवेन.
- माधुरी जाधव,  ठाणे

Web Title: Counseling of more than 500 Thanekars through Corona Counseling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.