शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

विचारेंसमोर नगरसेवकांनी वाचला समस्यांचा पाढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 00:15 IST

भार्इंदर पालिका : आयुक्तांसोबत केली चर्चा, कामे करण्याची केली सूचना, शिवसेनेमध्ये समाधान

मीरा रोड : मागील खासदारकीच्या कार्यकाळात महापालिकेतील विषयांबाबत काहीसे अलिप्त राहणारे खासदार राजन विचारे यांनी बुुधवारी पालिका आयुक्तांसह अधिकाऱ्यांची बैठक घेत शहरातील विविध समस्यांबाबत चर्चा केली. इतकेच नव्हे तर शिवसेना नगरसेवक व पदाधिकाऱ्यांच्या प्रलंबित तक्रारी, कामे आदीचा आढावा घेत प्रशासनाला कामे करण्याची समजही दिली. यापुढे नियमितपणे आयुक्तांसोबत बैठक घेऊन नागरिकांच्या तक्रारी, समस्यांचा पाठपुरावा करणार असल्याचे विचारे यांनी स्पष्ट केले.

विचारे यांनी आयुक्त बालाजी खतगावकर यांच्यासह पालिका अधिकाºयांसोबत दोन तास बैठक घेतली. या वेळी नगरसेवक व पदाधिकाºयांनी त्यांच्या प्रलंबित तक्रारी, कामे आदी खासदारांसमोरच आयुक्तांना बोलून दाखवली. निवडणुकीचे कारण पुरे झाले, आता कामे करा असे विचारेंनी प्रशासनास बजावले. उत्तन येथील डम्पिंग ग्राऊंडमुळे ग्रामस्थ त्रस्त असून पावसाळ्यात आणखीनच त्रास होणार आहे. ग्रामस्थांनी अजून किती त्रास सहन करायचा असा सवाल त्यांनी केला. आयुक्तांनी शहरात सहा ठिकाणी नवीन कचरा प्रकल्पाचे काम सुरू करणार असून उत्तन येथे साचलेल्या कचºयावर प्रक्रिया करणार आहोत असे आश्वस्त केले. लिचेटसाठी व्यवस्था करू असे ते म्हणाले. धोकादायक इमारतींचा प्रश्न गंभीर असून पालिकेला मिळालेल्या सदनिका या आपत्कालिन स्थिती उद्भवल्यास संक्रमण शिबिर म्हणून राखीव ठेवा, असे आयुक्तांना सांगितले. भार्इंदर व मीरा रोड स्थानक परिसरातील नागरिकांना अडथळा ठरणाºया फेरीवाल्यांवर ठोस कारवाई होत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.

नगरसेवक एलायस बांड्या यांनी उत्तन येथील हिंदू स्मशानभूमीत वीज, सुरक्षारक्षक आदी सुविधा नसल्याचे सांगत तेथे मद्यपान आदी चालत असल्याचे निदर्शनास आणले. माजी नगरसेवक जॉर्जी गोविंद यांनी चौक येथील चिमाजी अप्पा स्मारक अजून रखडल्याचे सांगितले.नगरसेविका शर्मिला गंडोली यांनी नवी खाडी, उपजिल्हाप्रमुख संदीप पाटील तर विकास पाटील यांनी नवघर खाडी मधील भराव - बांधकामे काढून तिवरांचा अडथळा दूर करण्याची मागणी केली. आयुक्तांनी खाड्यांचे रूंदीकरण व सफाईसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणार असल्याचे आश्वासन दिले. साई पुष्पम ही धोकादायक इमारत तोडण्यासाठी पालिकेने १५ लाखांची मागणी केल्याचे सांगत नगरसेवक दिनेश नलावडे यांनी खळबळ उडवून दिली.

प्रभाग अधिकारी संजय दोंदे यांनी काम थांबवल्याचे ते म्हणाले. पालिकेच्या प्रमोद महाजन हॉल व ठाकरे हॉल चालक कंत्राटदारांकडून मोनोपोली लादली जात असून नागरिकांकडून बळजबरी वसुली केली जात असल्याचा मुद्दा मांडण्यात आला.नगरसेवक कमलेश भोईर यांनी तर दबावाखाली काम करू नका असे आयुक्त आणि अधिकाºयांना सुनावले. काशी गावातील मंडई होऊनही त्यात फेरीवाल्यांना स्थलांतरीत केले नाही. प्लेझेंट पार्क येथील व्यायामशाळेच्या आरक्षणात मार्केटचा घाट घालत काही भागात शेड असूनही कारवाई होत नसल्याचे ते म्हणाले.अग्निशमन केंद्रात चक्क शॉपिंग सेंटरउपजिल्हासंघटक शुभांगी कोटियन यांनी भार्इंदर अग्निशमन केंद्रात पालिकेने चक्क हॉल, शॉपिंग सेंटरचे बांधकाम करण्याचा घाट घातल्याबद्दल रहिवाशांचा विरोध असल्याचे आयुक्तांना सांगितले. हॉल आदी झाल्यास अग्निशमन दलाच्या वाहनांना अडथळा होणार असल्याने ते रद्द करा, अशी मागणी त्यांनी केली. संतोष गुप्ता यांनी खारीगावातील मासळी मार्केट सुरू न केल्याबद्दल संताप व्यक्त केला.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरthaneठाणे