नगरसेवकाची अधिकाऱ्यांना शिवीगाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 00:53 IST2019-07-30T00:53:07+5:302019-07-30T00:53:11+5:30
अंबरनाथ नगर परिषदेच्या सफाई कामगारांना दुसºया आणि चौथ्या शनिवारी सुटी देण्यात येत असल्याने महिन्यातील दोन आठवडे सलग ४८ तास कामगारांना सुटी मिळत आहे

नगरसेवकाची अधिकाऱ्यांना शिवीगाळ
अंबरनाथ : सफाई कामगारांना शनिवारी साप्ताहिक सुटी का दिली, याचा भाजप नगरसेवक सुनील सोनी यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. त्यावरून अधिकाºयांबरोबर बाचाबाची होऊ न सोनी यांनी अंबरनाथ नगर परिषदेचे मुख्याधिकारी देविदास पवार आणि आरोग्य अधिकारी सुरेश पाटील यांना सोमवारी शिवीगाळ केली. तसेच मुख्याधिकाºयांच्या अंगावर धावून जात खुर्चीने मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामध्ये पालिका कार्यालयात काहीवेळ तणाव होता.
अंबरनाथ नगर परिषदेच्या सफाई कामगारांना दुसºया आणि चौथ्या शनिवारी सुटी देण्यात येत असल्याने महिन्यातील दोन आठवडे सलग ४८ तास कामगारांना सुटी मिळत आहे. सफाई कामगारांना ही सुटी दिली जात असल्याने दोन आठवडे सलग दोन दिवस शहरात सफाईच्या कामात अडथळा निर्माण होत आहे. सफाई कामगारांना सलग ४८ तासांची साप्ताहिक सुटी दिल्याने प्रभागातील सफाईच्या कामावर त्याचा परिणाम होत आहे. याप्रकरणी सोनी पालिकेकडे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. त्यातच शनिवारी पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने सफाई कामगारांनी वेळेत काम न केल्याने सोमवारी सोनी यांनी अधिकाºयांना जाब विचारला. त्यावरून हा वाद विकोपाला गेला.