शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पाणीवितरण रिमॉडेलिंगचा खर्च ६९ कोटींनी वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 04:20 IST

दिव्याचाही केला समावेश : बांधणार नवे १० जलकुंभ, मुंब्य्राची पाणीटंचाई होणार दूर

ठाणे : ठाणे महापालिकेने घोडबंदरच्या रिमॉडेलिंगच्या धर्तीवर मुंब्य्राचीही तहान भागवण्याचा निर्णय घेतला असून तसा प्रस्ताव येत्या महासभेत ठेवला आहे. यामुळे येत्या काळात मुंब्य्राची तहान भागवली जाणार आहे. हे काम महापालिका स्वत: करणार असून यासाठी लागणाऱ्या खर्चात दिव्याचाही समावेश केल्याने ६९ कोटींनी वाढ झाली आहे.

ठाणे महापालिकेने मुंब्य्रातील पाणीवितरण व्यवस्थेचे रिमॉडेलिंग प्रकल्पाचा अहवाल तयार केला होता. त्यानुसार, २०१०-११ मध्ये यासाठी ९७.४१ कोटींचा खर्च अपेक्षित होता. केंद्राच्या जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत हे काम करण्याचे निश्चित केले होते. परंतु, त्यासाठी निधी उपलब्ध नझाल्याने ही योजना बंद झाली. त्यामुळे ती कशी राबवायची, असा पेच पालिकेपुढे पडला होता. त्यानंतर, केंद्राच्या अमृत योजनेतून ते करण्याचा पालिकेने विचार केला होता. परंतु, अमृत योजनेतूनदेखील या प्रस्तावाला मान्यता न मिळाल्याने अखेर तिचा खर्च स्वत: करण्याची तयारी पालिकेने सुरू केली आहे.

सध्या मुंब्य्राची लोकसंख्या वाढली असून येथे असलेले जलकुंभ हे २०११ पर्यंत पाणीपुरवठा होईल एवढेच होते. परंतु, आता त्यात वाढ होणे अपेक्षित आहे. त्यानुसार, आता एकूणच तेथील पाणीवितरण व्यवस्थेचे रिमॉडेलिंग करण्याचा निर्णय घेतला असून यासाठी १२६ कोटींचा खर्च अपेक्षित होता. परंतु, तीत दिव्याचाही समावेश केल्यामुळे तो १९६ कोटींच्या घरात गेला आहे. यात मुंब्रा व दिवा विभागांसाठी पाणीपुरवठ्याचे नियोजन हे पायाभूत वर्ष २०१८ धरून पुढील ३० वर्षांसाठी वहनव्यवस्था व वितरणव्यवस्था गृहीत धरण्यात येणार आहे.

जलकुंभ संप व पंपहाउस १५ वर्षे कालावधीसाठी संकल्पित करण्यात येतील. या योजनेसाठी महापालिकेची स्वत:ची योजना व एमआयडीसीकडून पाणी उपलब्ध करून देणार आहे. मुंब्रा, दिवा विभागांसाठी मुख्य जलसंतुलन टाकी बांधण्याचा समावेश करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे मुंब्रा आणि दिव्यातील शेकडो इमारतीमधील रहिवाशांना दिलासा लाभणार आहे.नव्याने २०० मिमी ते एक हजार मिमी व्यासाच्या सुमारे १८ किमी लांबीच्या जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. तसेच या कामासाठी सल्लागाराचीही नेमणूक केली जाणार आहे. या योजनेंतर्गत नव्याने १० जलकुंभ बांधले जाणार असून आदी कामांसह इतर कामांचा यात समावेश केला आहे. 2018-19 या वर्षात ३० कोटी, २०१९-२० मध्ये ९० कोटी आणि २०२०-२१ या कालावधीत ७६ कोटींचा खर्च केला जाणार आहे. महासभेच्या मंजुरीनंतर निविदा प्रक्रिया राबवून ही कामे केली जाणार आहेत. 

टॅग्स :WaterपाणीthaneठाणेCorruptionभ्रष्टाचार