शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची चाल ओळखली, ट्रम्प यांच्या निर्णयाला १० देशांचा विरोध; पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान एकत्र
2
९ पानी चिठ्ठी, अनेक बड्या अधिकाऱ्यांची नावे...; IPS पूरन कुमार मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
3
थरार! जयपूर-अजमेर हायवेवर गॅस टँकरचा स्फोट; परिसरात हाहाकार, २० गाड्या आगीत भस्म
4
या देशाने आधीच भारतासोबत पंगा घेतला होता, आता पाकिस्तानचा उल्लेख करून ट्रम्प यांची स्तुती केली
5
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
6
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
7
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
8
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...
9
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
10
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
11
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
12
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
13
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
14
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
15
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
16
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
17
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
18
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
19
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
20
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा

पाण्यासाठी नगरसेवकाचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2021 00:50 IST

आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या : ठामपाने दिले लेखी आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे :  खिडकाळी भागात शनिवारी एमआयडीसीची जलवाहिनी फुटल्याने मुंब्रा, दिव्यासह इतर भागांना मागील चार दिवसांपासून पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. टँकरेनेही अपुरा पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे मुंब्रा, कौसा भागांची पाणीटंचाईतून सुटका व्हावी, या मागणीसाठी मुंब्य्रातील राष्ट्रवादीचे नगरसेवक शानू पठाण यांनी महापालिका मुख्यालयातील आयुक्तांच्या दालनाबाहेर सोमवारी हातात हंडा घेऊन ठिय्या आंदोलन केले. पाणीपुरवठा विभागाने लेखी आश्वासन दिल्यानंतर अखेर त्यांनी आंदोलन मागे घेतले.

मागील काही दिवसांपासून वारंवार जलवाहिनी फुटत असल्याने, अनेक भागांना पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. त्यात कळवा, मुंब्रा भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या एमआयडीसीकडून शटडाऊनही घेतले जात आहे. त्यामुळे या भागात आधीपासूनच पाण्याची टंचाई सतावत आहे. त्यात शनिवारी खिडकाळी येथे एमआयडीसीची जलवाहिनी फुटल्याने कळवा, मुंब्रा, दिवा भागाला पाणीटंचाईच्या झळा अधिक सहन कराव्या लागल्या. आधीच वारंवार घेतले जाणारे शटडाऊन आणि त्यात जलवाहिनी फुटल्याने मुंब्रा, कौसा भागाला पाणीटंचाई अधिक प्रमाणात सहन करावी लागत आहे. त्यातही जलवाहिनी दुरुस्त झाल्यानंतरही अद्यापही या भागातील ९० टक्के जनतेला पाणी मिळाले नसल्याचा आरोप करून पठाण यांनी आयुक्तांच्या दालनाबाहेर हे आंदोलन केले. यावेळी अशी आपत्कालीन परिस्थिती भविष्यात निर्माण झाल्यास स्टेमकडून या भागाला तात्पुरत्या स्वरूपात पाणीपुरवठा करावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली, तसेच मुंब्रा प्रभाग समितीअंतर्गत पाणीपुरवठा विभागात अधिकारी, कर्मचाऱ्यांची वाणवा असून, त्या जागाही तत्काळ भरून पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत करावा, अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, आयुक्त एका मीटिंगसाठी गेले असल्याने पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी आयुक्तांच्या दालनाबाहेर धाव घेऊन त्यांची समज काढण्याचा प्रयत्न केला, परंतु लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत आपण येथून उठणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला. 

‘शटडाऊनची माहिती कळवणार’एमआयडीसीकडून कमीत कमी शटडाऊन घेतला जाईल, तसेच शटडाऊनची माहिती पालिका आणि स्थानिकांना कळविण्यात येईल, या काळात पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिका प्रयत्नशील राहिल, टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येईल, तसेच मुंब्रा प्रभाग समितीसाठी पूर्णवेळ कनिष्ठ अभियंता व उपअभियंता तीन दिवसांत देण्यासाठी आयुक्तांबरोबर चर्चा करण्यात येईल, असे आश्वासन अतिरिक्त नगरअभियंता अर्जुन अहिरे आणि पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद पवार यांनी दिले.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका