नगरसेवकाची रिक्षाचालकाला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:42 IST2021-05-27T04:42:39+5:302021-05-27T04:42:39+5:30
अंबरनाथ : उल्हासनगरचा शिवसेना नगरसेवक व त्याच्या साथीदारांनी एका रिक्षाचालक तरुणाला मंगळवारी (दि. २५) रात्रीच्या सुमारास बेदम मारहाण केली. ...

नगरसेवकाची रिक्षाचालकाला मारहाण
अंबरनाथ : उल्हासनगरचा शिवसेना नगरसेवक व त्याच्या साथीदारांनी एका रिक्षाचालक तरुणाला मंगळवारी (दि. २५) रात्रीच्या सुमारास बेदम मारहाण केली. यात रिक्षाचालक जखमी झाला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी नगरसेवक व इतर दोघाजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अंबरनाथ (पूर्व) येथील धर्माजी कॉलनी या परिसरात रवी प्रकाश जयसिंघानी (वय २३) हा रिक्षाचालक त्याच्या कुटुंबीयांसह राहतो. मंगळवारी रात्री सव्वाबाराच्या सुमारास रवी त्याच्या घराबाहेर फिरत असताना त्याच्या शेजारी राहणारा उल्हासनगरचा शिवसेना नगरसेवक आकाश पाटील त्या ठिकाणी आला व जुन्या भांडणाचा राग मनात ठेवून रवीला घराबाहेर का फिरतोस असे विचारू लागला. यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली. संतप्त झालेल्या आकाशने कमरेचा बेल्ट काढून त्याने रवीला मारहाण केली. नंतर आकाशचे साथीदार यश पाटील व मनीष यांनी लोखंडी रॉडने रवीला बेदम मारहाण केली. या घटनेत रवी हा गंभीररीत्या जखमी झाला आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस नाईक व्ही. एन. वळवी करीत आहेत.