शहरं
Join us  
Trending Stories
1
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
2
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
3
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
4
समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
5
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
6
AI बिनधास्त वापरा, पण त्याआधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा! नाहीतर स्वतःच अडचणीत सापडाल
7
५ राशींवर दुर्गा देवीची कायम लक्ष असते, लाभते विशेष कृपा; हाती राहतो पैसा, शुभ-कल्याण-भरभराट!
8
कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला
9
सेन्सेक्सलाही टाकले मागे! सरकारी कंपनीचा शेअर महिन्यात ४०% नी वधारला; तेजीचे कारण काय?
10
लेक राहासाठीही आहे वेगळी व्हॅनिटी व्हॅन, आलियाचा प्रश्न ऐकून महेश भटही झाले शॉक
11
भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट
12
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार हवा, पण अर्धी अमेरिकाच नाखूश! सर्वेक्षणात झाला धक्कादायक खुलासा 
13
IND vs PAK: 'इतका राग होता तर खेळलाच कशाला?' हस्तांदोलन न करण्यावर शशी थरूर संतापले!
14
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
15
वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडू; मंत्री मकरंद पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
16
भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर, कशी असेल पुढची वाटचाल? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
17
भगवा कुर्ता, कपाळी भस्म; संजय दत्तने घेतलं महाकालेश्वरचं दर्शन, भक्तीत तल्लीन झाला अभिनेता
18
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
19
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला

coronavirus: विनापरवाना परराज्यात निघालेले टेम्पो पकडले, तीन टेम्पोंमध्ये भरले होते ९८ परप्रांतीय प्रवासी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2020 03:06 IST

माणिकपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सनसिटी व अंबाडी रोड, ६० फुटी रोडवर शनिवारी नाकाबंदीदरम्यान माणिकपूर पोलिसांकडून कसून तपासणी सुरू होती. यादरम्यान तिन्ही टेम्पोंची तपासणी केल्यावर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

वसई : सर्वत्र लॉकडाउन सुरू असताना विनापरवाना ९८ नागरिकांना भरून उत्तर प्रदेशकडे निघालेले तीन टेम्पो पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. परराज्यात स्थलांतर करण्यासाठी पालघर जिल्हाधिकाऱ्यांची कुठलीही लेखी परवानगी न घेता, प्रवासी वाहतुकीसंदर्भातील सवलतीचा गैरवापर घेतल्याप्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात टेम्पोचालक-मालकांसह क्लीनरवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी ‘लोकमत’ला दिली.माणिकपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सनसिटी व अंबाडी रोड, ६० फुटी रोडवर शनिवारी नाकाबंदीदरम्यान माणिकपूर पोलिसांकडून कसून तपासणी सुरू होती. यादरम्यान तिन्ही टेम्पोंची तपासणी केल्यावर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. लॉकडाउन काळात अत्यावश्यक सेवा व वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे, मात्र परराज्यातील प्रवाशांचे स्थलांतर व वाहतुकीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीची अट आहे. परंतु, प्रशासनाने दिलेल्या सवलतीचा चुकीच्या पद्धतीने अर्थ काढून, कायदा मोडून परराज्यातील लोकांची विनापरवानगी टेम्पोतून वाहतूक होऊ शकते, ही बाब लक्षात घेऊन जिल्ह्यात, तालुक्यात प्रवेश करणाºया व बाहेर जाणाºया प्रत्येक तपासणीनाक्यांवर पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे.माणिकपूरचे पोलीस शिपाई शिवाजी डोळे सनसिटी पॉइंटवर नाकाबंदी वेळी शनिवारी उभे असताना त्यांनी सनसिटी येथे दोन टेम्पोंना थांबवून त्यांची चौकशी केली असता त्यात एका टेम्पोत ५१ व दुसºया टेम्पोत ३५ प्रवासी मिळून आले.अंबाडी रोड, ६० फुटी रोडवर एका टेम्पोची तपासणी केली असता त्यात १२ प्रवासी आढळून आले. तिन्ही टेम्पोतील ९८ प्रवाशांनी आपण उत्तर प्रदेशात जात असल्याचे पोलिसांना सांगितले. माणिकपूर पोलिसांनी हे तिन्ही टेप्पो ताब्यात घेऊन चालक, मालक व क्लीनर यांच्यावर कारवाई करीत या टेम्पोमधील पररप्रांतीय लोकांची विनापरवानगी वाहतूक, जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा अवमान तसेच विनापरवाना प्रवासी वाहतूक करीत असल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसtraffic policeवाहतूक पोलीस