CoronaVirus: ठाण्यातील आणखी दोन पोलिसांना कोरोनाची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 03:03 IST2020-04-20T03:02:26+5:302020-04-20T03:03:43+5:30

मुंब्य्रातील पोलीस कर्मचारी; कोरोनाबाधित पोलिसांची संख्या १७ वर

CoronaVirus two more personnel of mumbra police station found corona positive | CoronaVirus: ठाण्यातील आणखी दोन पोलिसांना कोरोनाची लागण

CoronaVirus: ठाण्यातील आणखी दोन पोलिसांना कोरोनाची लागण

ठाणे : मुंब्रा पोलीस ठाण्याच्या आणखी दोन पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील कोरोनाबाधित पोलिसांची संख्या १७ वर पोहोचली.

मुंब्य्रातील दोन निरीक्षक, एक सहायक पोलीस निरीक्षक आणि एका कर्मचाऱ्याला लागण झाल्यानंतर १९ पोलिसांना विलगीकरण केंद्रामध्ये तर १९ जणांना होम क्वारंटाइन केले आहे. आता मुंब्रा पोलीस ठाण्याच्या आणखी दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यापैकी एक जण सोलापूर येथे सुटीवर गेला होता. त्याला तिथेच १७ एप्रिलला लक्षणे जाणवली. त्याची चाचणी पॉझिटिव्ह आलीे. तो जिल्हा सोडून सोलापूरमध्ये सुटीवर कोणत्या कारणासाठी गेला, याचीही चौकशी सुरू आहे. तर अन्य एक जण त्याच पोलीस ठाण्यातील असून त्यालाही शुक्र वारी रात्री ठाणे जिल्हा रु ग्णालयात दाखल केले आहे. आतापर्यंत १५ पोलिसांना कोरोनाची लागण झाली होती. या दोघांमुळे ही संख्या आता १७ झाल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाºयाने दिली.

Web Title: CoronaVirus two more personnel of mumbra police station found corona positive