शहरं
Join us  
Trending Stories
1
"मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर मी मुंडण करेन, ४ जूनला एक्झिट पोल चुकीचे सिद्ध होतील"
2
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार, बहुतांश एक्झिट पोलचा अंदाज
3
व्हॉट्सॲपवरून ट्रिपल तलाक; पतीवर गुन्हा, पत्नीला धमकावल्याचा आरोप 
4
धक्कादायक! ११ प्रवाशांनी भरलेली बोट नदीत उलटली; ७ जणांचा बुडून मृत्यू, ४ जण बचावले
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - २ जून २०२४; यश, प्रतिष्ठा वाढेल, वरिष्ठ खूश असल्याने पदोन्नतीची शक्यता
6
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला महाराष्ट्राची अपेक्षित साथ नाही !
7
उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा
8
पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूलला देणार धक्का, २०१९च्या तुलनेत सरस कामगिरी करणार
9
हिटमॅनचा फॅन मैदानात शिरला! अमेरिकेच्या पोलिसांनी इंगा दाखवला; रोहितही अवाक्, Video
10
अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचे इटलीत सेलिब्रेशन
11
पंतप्रधान मोदींची ४५ तास ध्यान साधना, संतकवी तिरुवल्लुवर यांना वाहिली पुष्पांजली
12
जावई-सासऱ्यातील समेटासाठी मुलाचा आधार, संवाद साधण्याचा उच्च न्यायालयाचा सल्ला 
13
आजही अडचणींचा डोंगर, वेळेत काम पूर्ण करण्याचे नियोजन
14
एमएचटी-सीईटीच्या चुकीच्या उत्तरांची दखलच नाही, एक प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरील फॉर्म्युल्यावर आधारित 
15
भारतीय फलंदाजांनी निडरपणे खेळावे - सौरव गांगुली
16
स्कूलबसच्या अपघाताला शाळा संचालकही जबाबदार, पंजाब आणि हरयाणा हायकोर्टाने सुनावले
17
नेपाळ, नेदरलँड्स देऊ शकतात धक्का : गिलख्रिस्ट 
18
अकरावी प्रवेशासाठी ५ जूनपासून पसंतिक्रम, पहिल्याच फेरीचेच वेळापत्रक जाहीर
19
‘धूप से बचने के लिए टोपी तो दिजीए’, रणरणत्या उन्हात कामगार मेटाकुटीला
20
‘एअर टर्ब्युलन्स’ची माहिती मिळणार, प्रवासी सुरक्षेसाठी विशेष सॉफ्टवेअरची ‘इंडिगो’कडून चाचणी

coronavirus: ठाणे स्थानक, मॉलमध्ये मोफत अ‍ॅण्टीजेन चाचणी, दिवसाला पाच हजार चाचण्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2020 2:32 AM

आता शहरातील मॉलमध्ये येणा-या ग्राहकांसह परराज्यांतून येणाºया मजुरांसाठी ठाणे रेल्वेस्थानकात मोफत अ‍ॅण्टीजेन चाचणी केंद्रे सुरू केली आहेत. चार पथके या चाचण्या करीत असल्याचे महापालिकेने शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

ठाणे : कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करणाऱ्या ठाणे महानगरपालिकेने गुरुवारी एका दिवसात तब्बल ५,०५२ इतक्या चाचण्या केल्या. तर, आता शहरातील मॉलमध्ये येणा-या ग्राहकांसह परराज्यांतून येणाºया मजुरांसाठी ठाणे रेल्वेस्थानकात मोफत अ‍ॅण्टीजेन चाचणी केंद्रे सुरू केली आहेत. चार पथके या चाचण्या करीत असल्याचे महापालिकेने शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.राज्याचे नगरविकासमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सातत्याने चाचण्या वाढविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याचबरोबर महापौर नरेश गणपत म्हस्केही याचा पाठपुरावा करीत आहेत. त्यानुसार, आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी शहरात प्रभाग समितीनिहाय मोफत अ‍ॅण्टीजेन चाचणी केंद्रे सुरू केली आहेत.सुरुवातीला महानगरपालिका क्षेत्रात तीन हजारांपेक्षा जास्त आणि त्यानंतर रोज चार हजार चाचण्या करण्याचे उद्दिष्ट त्यांनी निश्चित केले होते. याशिवाय, गेल्या काही दिवसांपासून शहरामध्ये महापालिका तसेच खासगी प्राधिकृत प्रयोगशाळांच्या माध्यमातून सातत्याने चार हजारांपेक्षा जास्त कोरोना चाचण्या करण्याचे उद्दिष्ट महापालिकेने साध्य केले आहे. यानुसार, गुरुवारी शहरात सर्वाधिक एकूण ५,०५२ चाचण्यांचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. तसेच दुसºया बाजूला रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यातही प्रशासनाने यश मिळविले आहे.गणेशोत्सवामुळे वाढले रुग्णठाणे शहरात गेल्या काही दिवसांपासून आम्ही चाचण्यांची संख्या वाढविली आहे. आम्ही रोज चार हजारांच्यापुढे चाचण्या करीत आहोत. गुरुवारी पाच हजार चाचण्यांचा टप्पा पार केला आहे. गेल्या आठवड्यात काही प्रमाणात रुग्णसंख्या वाढली आहे, ही वस्तुस्थिती आहे. पण, गणेशोत्सवामुळे मोठ्या प्रमाणात नागरिक बाहेर पडले होते. त्याचबरोबर आम्ही चाचण्यांची संख्याही वाढविली आहे. त्यामुळे थोडी फार संख्या वाढली आहे. पण, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. महापालिका प्रशासन याबाबत सतर्क असून कोणत्याही परिस्थितीशी सामना करण्यास महापालिका सक्षम आहे, असे आयुक्त म्हणाले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे