Coronavirus: 'त्या' महिलेच्या उपचारांचा खर्च ठाणे महापालिका उचलणार; खासगी रुग्णालयात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2020 07:55 PM2020-06-14T19:55:40+5:302020-06-14T19:56:09+5:30

महिलेने दिला गोंडस मुलीला जन्म

Coronavirus: Thane Municipal Corporation will bear the cost of treatment woman; Admitted to a private hospital | Coronavirus: 'त्या' महिलेच्या उपचारांचा खर्च ठाणे महापालिका उचलणार; खासगी रुग्णालयात दाखल

Coronavirus: 'त्या' महिलेच्या उपचारांचा खर्च ठाणे महापालिका उचलणार; खासगी रुग्णालयात दाखल

Next

ठाणे : कोरोना रिपोर्टच्या गोंधळामुळे मनःस्ताप सहन करावा लागलेल्या महिलेच्या उपचारांचा सर्व खर्च उचलण्याचा निर्णय अखेर ठाणे महापालिकेने घेतला असून पालिकेच्या वतीनेच या महिलेला ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला असून या मुलीचे वजन ३ किलोचे असल्याची  माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तर सिव्हिल रुग्णालयाच्या वतीने दुसऱ्या महिलेचा रिपोर्ट नायर हॉस्पिटलला पाठवण्यात आला असल्याने हा सर्व गोंधळ निर्माण झाला होता,मात्र ठाणे महापालिकेची यामध्ये कोणत्याही प्रकारची चुकी नसल्याचा पुन्हा खुलासा पालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे.  

भिवंडी खारबाव या परिसरात राहणाऱ्या ३४ वर्षीय महिलेच्या कोरोना रिपोर्टच्या गोंधळामुळे ठाणे महापालिका आणि सिव्हिल रुग्णालयातील आरोग्य यंत्रणाच कामाला लागली होती. पत्नीचा रिपोर्ट चुकीचा दिला असल्याचा आरोप करत या महिलेच्या पतीने कळवा हॉस्पिटलच्या चुकींमुळेच माझी पत्नी कोरोना पॉझिटिव्ह झाली असल्याचा आरोप केला होता. यावर प्रशासनाने पुन्हा एकदा सर्व प्रकारचा खुलासा केला असून सदरची महिला ही पॉझिटिव्हच होती तसेच ज्या दुसऱ्या महिलेचा रिपोर्ट सिव्हिल हॉस्पिटलकडून नायर हॉस्पिटलला पाठवण्यात आला होता ती महिला देखील पॉझिटिव्हच होती असा खुलासा प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे. त्यामुळे यामध्ये ठाणे महापालिकेची कोणत्याही प्रकारची चूक नसल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.  

दरम्यान या सर्व प्रकारामुळे या महिलेला मनस्ताप सहन करावा लागल्यानंतर ठाणे महापालिकेनेच या महिलेला ठाण्यातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून या महिलेले रविवारी एका गोंडस मुलीला देखील जन्म दिला आहे. तर या महिलेचा उपचारांचा सर्व खर्च पालिका प्रशासनाच्या वतीनेच उचलला जाणार असल्याचे देखील प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. 

दुसरीकडे या महिलेच्या पतीकडून मात्र ठाणे महापालिकेकडून आरोप करणे सुरूच असून ज्या खाजगी रुग्णालयात आपल्या पत्नीला दाखल करण्यात आले आहे त्यांच्याकडून योग्य वागणूक मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मात्र असा कोणताही प्रकार या हॉस्पिटल कडून झाला नसून उलट संबंधित व्यक्तींकडून महिलेवर उपचार करत असलेल्या नर्स आणि डॉक्टरांना मानसिक त्रास देण्याचे काम सुरु असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. 

"या संपूर्ण प्रकरणात महापालिकेची चूक नसल्याचे स्पष्ट झाले असून तरीही मानवतावादी दृष्टिकोनातून ठाणे महापालिकेने सर्व खर्च उचलण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र महिलेच्या नातेवाईकांनी देखील आरोग्य यंत्रणाना सहकार्य करण्याची आवश्यकता असून अशाप्रकारे आरोग्य यंत्रणेवर आरोप करणे योग्य नाही . " -नरेश म्हस्के, महापौर, ठाणे 

" नायर हॉस्पिटलला दुसऱ्या महिलेचा रिपोर्ट पाठवल्यामुळे हा सर्व गोंधळ निर्माण झाला . ठाणे महापालिकेकडून या महिलेला योग्यच रिपोर्टचा संदेश पाठवण्यात होता. मात्र कोरोनाची लागण असल्याने आता केवळ संबंधित रुग्णाला इलेक्ट्रिनोक फॉर्ममध्ये रिपोर्ट पाठवण्यात येतो , कोणत्याही प्रकारच्या कागदरावर रिपोर्ट देण्यात येत नाही. पालिकेची चूक नसतानाही या महिलेचा सर्व खर्च पालिका उचलणार आहे.  - विश्वनाथ केळकर, उपायुक्त, ठा.म. पा

Web Title: Coronavirus: Thane Municipal Corporation will bear the cost of treatment woman; Admitted to a private hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.