शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : भाईंदरमधील रविवार बाजार कोरोनाच्या सावटातही गजबजला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2020 00:17 IST

वाहतुकीला अडथळा ठरणारा हा बाजार लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही बंद न ठेवल्याने महापालिका आणि नगरसेवकांचा वरदहस्त पुन्हा उघड झाला आहे.

मीरा रोड - कोरोनाचा संसर्ग फैलावू नये, म्हणून एकीकडे गर्दीची ठिकाणे बंद केली जात असताना भाईंदर पश्चिमेतील रविवारचा आठवडा बाजार गजबजला होता. सरकारने गर्दी टाळण्यासाठी दिलेले आदेश डावलून भरलेल्या बाजाराबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. वाहतुकीला अडथळा ठरणारा हा बाजार लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही बंद न ठेवल्याने महापालिका आणि नगरसेवकांचा वरदहस्त पुन्हा उघड झाला आहे.नव्याने आलेले प्रभाग अधिकारी प्रकाश कुलकर्णी यांनी महिनाभरापासून कारवाईच गुंडाळून टाकली आहे. पोलीसही दुर्लक्ष करत असल्यामुळे या बाजारावर कोरोनाचाही परिणाम झालेला नाही. गावाचे शहर झाले तरी बाजारवसुली करणाऱ्या ठेकेदारांना आणि त्यात हितसंबंध गुंतलेल्यांनेच हा बाजार रविवारी भरला.भाईंदर रेल्वेस्थानकापासून भाईंदर शहरच नव्हे तर मुर्धापासून थेट उत्तन-चौक व गोराईपर्यंत जाणारा एकमेव मुख्य मार्ग आहे. हा वाहतुकीसाठीचा एकमेव मार्ग असताना रविवार बाजारच्या आड फेरीवाले आणि हातगाडीवाल्यांची संख्या आठवड्यागणिक वाढलीआहे.आधीच बेकायदा पार्किंग, दुकान आणि फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे येथे वाहतूककोंडी नित्याची झालेली आहे. त्यातच रविवार बाजारामुळे भाईंदर पोलीस ठाण्यापासून शिवसेना गल्ली नाकयापर्यंतचा मुख्य रस्ता, दुसरीकडे नगरभवनपर्यंत आणि महापालिका मुख्यालयामागची गल्ली बेकायदा फेरीवाल्यांमुळे व्यापली आहे.पालिकेचे बसस्थानकही यांनी बळकावले आहे. शहराचा मुख्य मार्ग असल्याने एसटी, एमबीएमटी, बेस्ट या सार्वजनिक उपक्रमांच्या बस, रिक्षा, दुचाकी, चारचाकी वाहनांची मोठी वर्दळ असते.अतिक्रमणामुळे प्रचंड वाहतूककोंडी होऊन लोक अडकून पडतात. आपत्कालीन प्रसंगी रुग्णवाहिका, अग्निशमन दलाचे वाहनही येथून नेणे अशक्य बनले आहे. त्यातच भुरटे चोर, पाकीटमारांसह महिला-मुलींची छेड काढण्याचे प्रकार नेहमीचेच झालेले आहेत. रविवारचा बाजार सायंकाळपर्यंत बस्तान मांडून बसत आहे.बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर तसेच फेरीवाल्यांनी टाकलेला कचरा याचा उपद्रव लोकांना सहन करावा लागत आहे. डिसेंबर २०१५ च्या महासभेमध्ये भाजी आणि सुकी मासळीविक्रेत्या स्थानिकांना वगळून अन्य बाजार सुभाषचंद्र बोस मैदानाजवळ हलवण्याचा ठराव केला होता.तोही बासनात गुंडाळला आहे. फेरीवाल्यांशी तसेच बाजारवसुली ठेकेदाराचे नगरसेवक, राजकारणी आणि महापालिकेशी अर्थपूर्ण लागेबांधे असल्याशिवाय पालिका संरक्षण देणे शक्य नसल्याचे आरोप नागरिक करत आहेत.रविवार बाजारासंबंधी आयुक्तांशी चर्चा केली आहे. या बाजारामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याने रविवार बाजार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयुक्तांनी तसे आदेश उपायुक्तांना दिले आहेत.- डॉ. शशिकांत भोसले, पोलीस उपअधीक्षक, भाईंदरकोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती आणि रहदारी-वाहतुकीला होणारा अडथळा विचारात घेता पालिका रविवार बाजारावर कारवाई करण्यात येणार आहे.-चंद्रकांत डांगे, आयुक्त, मीरा-भाईंदर महापालिका

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोनाMira Bhayanderमीरा-भाईंदर