coronavirus : कोरोनाविरोधातील लढ्यासाठी केडीएमसीमधील शिवसेना नगरसेवकांनी दिले तीन महिन्यांचे मानधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 15:37 IST2020-03-29T15:35:58+5:302020-03-29T15:37:12+5:30
शिवसेनेचे नगरसेवक महेश गायकवाड, श्रेयस समेळ, माधुरी काळे यांनी त्यांचे तीन महिन्याचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिले आहे.

coronavirus : कोरोनाविरोधातील लढ्यासाठी केडीएमसीमधील शिवसेना नगरसेवकांनी दिले तीन महिन्यांचे मानधन
कल्याण - कोरोनाशी लढा देताना सरकारी तिजोरीवर ताण येणार आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधीनी त्यांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिला आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेतील नगरसेवकाना महिन्याला दहा हजार रुपयांचे मानधन मिळते. महापालिकेतील शिवसेनेचे नगरसेवक महेश गायकवाड, श्रेयस समेळ, माधुरी काळे यांनी त्यांचे तीन महिन्याचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिले आहे. प्रत्येक नगरसेवकाचे तीन महिन्याचे मानधन प्रत्येकी 30 हजार रुपये होते. त्यानुसार तीन नगरसेवकांकडून 90 हजार रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केला जाणार आहे.
दरम्यान महापालिकेची गाडी ही फवारणीकरीता गल्ली बोळात जाऊ शकत नाही. त्यामुळे नाशिक येथे द्राक्षांच्या फवारणीसाठी वापरले जाणारे लहान आकाराचे फवारणी ट्रॅक्टर शिवसेना नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी मागविले आहेत. या ट्रॅक्टरच्या सहाय्याने डोंबिवली पश्चिमेतील चाळ वस्तीच्या शेवटच्या टोकार्पयत फवारणी केली जात आहे. ही फवारणी रात्रीच्या वेळेत केली जात आहे.
दरम्यान शिवसेना नगरसेवक दशरथ घाडीगावकर यांच्या वतीने आज सकाळी कल्याण स्टेशन परिसरात गरजूंन चहा बिस्कीटचे वाटप करण्यात आले. यावेळी अनेक निराधार व गरजूंना चहा बिस्कीटे मिळाली. मुस्लीम मोहल्ल्यातील अपक्ष नगरसेवक काशीफ तानकी यांनी देखील दूधनाका परिसरात गरजूंकरीता चहा व बिस्कीटांचे वाटप केले.