Coronavirus : मास्कवाटपासाठी झाली तोबा गर्दी, कसा होणार ठाण्यातून कोरोना हद्दपार?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 01:48 AM2020-03-18T01:48:31+5:302020-03-18T01:49:15+5:30

ठाण्यात चक्क पालकमंत्री आणि पोलीस आयुक्तांच्या उपस्थितीत कोरोनाबाबतच्या निर्देशांची मंगळवारी पायमल्ली करण्यात आली.

Coronavirus: rush for mask Distribution, how will Corona expel from Thane? | Coronavirus : मास्कवाटपासाठी झाली तोबा गर्दी, कसा होणार ठाण्यातून कोरोना हद्दपार?

Coronavirus : मास्कवाटपासाठी झाली तोबा गर्दी, कसा होणार ठाण्यातून कोरोना हद्दपार?

Next

ठाणे : जीवघेण्या कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी कमीत कमी गर्दी करणे, हा सर्वाधिक जालीम उपाय असून, त्यासाठी शासनस्तरावर विविध उपाययोजनांसह मोठ्या प्रमाणात जनजागृती सुरू असताना, ठाण्यात चक्क पालकमंत्री आणि पोलीस आयुक्तांच्या उपस्थितीत याबाबतच्या निर्देशांची मंगळवारी पायमल्ली करण्यात आली. निमित्त होते ठाणे स्टेशन आणि तीनहातनाका परिसरात मास्क आणि सॅनिटायझर वाटपाचे. यासाठी रिक्षाचालकांसह पोलीस कर्मचाऱ्यांनी केलेली तोबा गर्दी पाहता, हे तर कोरोनाला एक प्रकारे निमंत्रणच असल्याची चर्चा सुज्ञ नागरिकांमध्ये होती.

ठाणे स्टेशन आणि तीनहातनाका परिसरात रिक्षाचालकांसह पोलीस कर्मचाऱ्यांना मंगळवारी मास्क आणि सॅनिटायझर वाटप करण्यात आले. स्टेशन परिसरात या कार्यक्रमाला पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि पोलीस आयुक्त विवेक फणसळकर जातीने उपस्थित होते. एकीकडे शासनाकडून गर्दी न करण्याचे आदेश असताना दुसरीकडे स्टेशन परिसरात कार्यक्र माचे आयोजन करून मोठी गर्दी करण्यात आली. पालकमंत्र्यांनी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यातील कर्मचाºयांना या वेळी मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक ए. एस. पठाण हेदेखील या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. स्टेशन परिसरातील कार्यक्रमाची सुरुवात करून दिल्यानंतर पालकमंत्री आणि पोलीस आयुक्त निघून गेले. ते जाताच मास्क आणि सॅनिटायझर पदरात पाडून घेण्यासाठी रिक्षाचालकांसह पोलीस कर्मचा-यांची एकच झुंबड उडाली. मास्क घेण्यासाठी रिक्षाचालक रांगेत दाटीवाटीने उभे होते. गर्दी एवढी झाली होती की, या परिसरात श्वास घेणेही कठीण झाले होते. कार्यक्रमाचा उद्देश चांगला असला तरी अशी गर्दी जमवून कोरोना कसा हद्दपार होणार, अशी कुजबूज येथून जाणाºया सुज्ञ नागरिकांमध्ये होती.

तीनहातनाका परिसरात माजी खासदार नीलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त अशाच प्रकारे मास्क वाटप करण्यात आले. कोरोनापासून कसा बचाव करता येईल, यासाठी या वेळी जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन स्वाभिमानी संघटनेने केले होते. शासकीय, निमशासकीय कर्मचारी, पालिकेचे कर्मचारी, पोलीस, टीएमटी बसचालक व वाहकांना शासनाने सॅनिटायझर आणि मास्क द्यावेत, अशी मागणी या वेळी संघटनेने केली.
बंदमुळे एकमेकांसोबत वेळ घालवायला मिळतेय संधी - वृत्त/२

Web Title: Coronavirus: rush for mask Distribution, how will Corona expel from Thane?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.