शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर रात्रीच हल्ला? नेतन्याहू यांच्या विमानाचं हवेत उड्डाण; ५० ठिकाणं अमेरिकेच्या हिटलिस्टवर
2
इराण-अमेरिका युद्धाची शक्यता? तेहरानच्या इशाऱ्यानंतर कतारमधील अमेरिकन हवाई तळ केले रिकामे
3
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर आज रात्री फैसला; ट्रम्प यांच्याविरोधात निकाल गेल्यास काय घडू शकतं?
4
हजारीबागमध्ये भीषण बॉम्ब ब्लास्ट, तिघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
5
शिंदेंच्या उमेदवाराच्या घरावर मतदानाआधी दगडफेक; खिडक्या फोडल्या, खुर्च्या तोडल्या, प्रचंड राडा
6
मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?
7
धक्कादायक ! नागपुरात बाप झाला सैतान,पत्नीकडे ताबा जाऊ नये म्हणून पोटच्या मुलीची हत्या
8
लहानपणीची गोंडस मुलगी आता झालीये सुपरहॉट, रेड बॅकलेस ड्रेसमध्ये सारा अर्जुनचा किलर लूक!
9
"JJD हा लालूंचा खरा पक्ष"; राजद विलीनीकरणावर तेजप्रताप यांची तेजस्वींना थेट ऑफर
10
Petrol कार्सच्या तुलनेत Diesel कार्स जास्त मायलेज का देतात? जाणून घ्या यामागील विज्ञान...
11
बांगलादेशचा आडमुठेपणा! भारतात टी-२० वर्ल्डकप खेळण्यास नकार; आता आयसीसीकडे आहेत ३ पर्याय!
12
IND vs NZ : हर्षित राणानं ऑफ स्टंप उडवत डेवॉन कॉन्वेचा केला करेक्ट कार्यक्रम! गंभीरने अशी दिली दाद
13
मुस्लिमबहुल प्रभागांत रंगणार काँग्रेस-एमआयएम सामना! १३ जागांसाठी काँग्रेसची धडपड, शिंदेसेना चारही जागा राखणार?
14
डोंबिवलीत भाजपा अन् शिंदेसेनेत जोरदार राडा; ५ जणांना अटक, जखमींवर रुग्णालयात उपचार
15
Video - ई-रिक्षातील तरुणाचं अश्लील कृत्य; रणरागिणीने रस्त्यावरच घडवली चांगलीच अद्दल
16
"विना परवाना शस्त्र वाटणार, ज्याला हवं त्याने..."; योगी सरकारच्या मंत्र्याचं धक्कादायक विधान
17
भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद, आता ५५ देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवेशाची परवानगी
18
‘तातडीने इराण सोडा, मिळेल त्या वाहनाने बाहेर पडा’, भारतीय दूतावासाकडून आपल्या नागरिकांना सूचना
19
रॉकेट बनलाय हा पेनी स्टॉक, ५ दिवसांत दिला ६१% परतावा; फक्त २० रुपयांवर भाव! तुमच्याकडे आहे का?
20
"त्यांच्या शेवटाची वाट पाहत होता, हे स्वप्न नाही तर नमकहरामी"; अश्विनी जगतापांच्या स्टेटसने संघर्ष चव्हाट्यावर
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनाचा भोंगळ कारभार; 'ती' कोरोनाबाधित गर्भवती सहा तास रुग्णवाहिकेसाठी ताटकळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2020 18:27 IST

मनसेच्या कार्यकर्त्यांनी दबाव आणल्यानं प्रशासनाला पाठवली रुग्णवाहिका

डोंबिवली पश्चिमेतील कोरोनाग्रस्त गर्भवती महिलेच्या पतीने रुग्णवाहिकेसाठी शास्त्रीनगर रुग्णालयास फोन केला असता रुग्णवाहिका व्यस्त आहेत. शक्य असल्यास महिलेला घेऊन ठाणे सिव्हिल रुग्णालय गाठा असा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आला. महिलेला तब्बल सहा तास रुग्णवाहिकेसाठी वाट पाहावी लागली. मनसे कार्यकर्त्यांनी या प्रकरणी तत्परता दाखवून प्रशासनावर दबाव निर्माण केल्यावर महिलेला घेण्यासाठी रुग्णवाहिका आली. यातून पुन्हा एकदा महापालिकेचा ढिसाळ कारभार समोर आला आहे. त्याचा फटका या महिलेला बसला आहे.दोन दिवसापूर्वी डोंबिवलीतील कोरोनाग्रस्त तरुणाला रुग्णवाहिका घेण्यास आली नाही. त्या रुग्णाला चालत येण्याचा सल्ला रुग्णालयाकडून देण्यात आला होता. या प्रकरणी महापालिका आयुक्तांनी चौकशी सुरु केली आहे. त्यानंतर काल सायंकाळी कल्याणमधील एका 71 वर्षीय कोरोना संशयित वृद्धाला घेण्यासाठी आलेली रुग्णवाहिका आली. पण रुग्णाला न घेताच चालक उपवास सोडण्याचे कारण सांगून निघून गेल्याचा प्रकार घडला. या घटनेपाठोपाठ आत्ता कोपरमधील गर्भवती कोरोना पॉझिटिव्ह महिलेला रुग्णवाहिकेसाठी सहा तास वाट पाहावी लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.मनसेचे कार्यकर्ते ओम लोके व सागर मुळे यांच्या पुढाकाराने रुग्णालय प्रशासनावर दबाव टाकल्यावर महिलेस रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ही महिला नऊ महिन्याची गरोदार आहे. तिच्या प्रसूतीची तारीख जवळ आली आहे. त्यात तिचा कोरानाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तिच्या पतीने तातडीने शास्त्रीनगर रुग्णालयाशी संपर्क साधला. त्याठिकाणी रुग्णालयातून सांगण्यात आले की, आज महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यामुळे रुग्णवाहिका व्यस्त आहेत. महिलेला ठाणे सिव्हिलमध्ये घेऊन जाणे शक्य असल्यास तुम्ही जाऊ शकता असा उरफाटा सल्ला दिला गेला. या महिलेचा पतीच्या संपर्कात सागर मुळे होते. त्यांनी ओम लोके यांना संपर्क साधला. लोके यांनी खाजगी रुग्णवाहिकेची व्यवस्था केली. मात्र रुग्णालयाने खाजगी रुग्णवाहिकेतून घेऊ जाता येणार नाही अशी हरकत घेतली. कोविड पॉझिटिव्ह रुग्णाला घेऊन जाण्यासाठी कोविड रुग्णालयाची रुग्णवाहिका हवी. प्रशासन पेचात पकडत असल्याने लोके यांनी प्रशासनावर दबाव टाकला. तेव्हा त्यांना सहा तासानंतर रुग्णवाहिका उपलब्ध करुन दिल्यावर महिलेला ठाणे सिव्हील रुग्णालयात काल सायंकाळी दाखल करण्यात आले. गर्भवती कोरोना ग्रस्त महिलांच्या उपचाराची सोय कल्याण डोंबिवलीत नाही. त्यांच्या उपचाराची व्यवस्था ठाणे सिव्हिल रुग्णालयात केली आहे. कोपरमधील महिलेची प्रसूती तारीख जवळ आल्याने तिच्याबाबतीत अधिक चिंता होती. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या