शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: १७ अधिकाऱ्यांसह १९६ पोलीस विलगीकरणातून पुन्हा ऑन ड्युटी’, आतापर्यंत सात अधिकाऱ्यांसह ४0 पोलिसांना लागण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2020 02:33 IST

आतापर्यंत सात अधिकाºयांसह ४0 पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून, त्यातील २२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. विलगीकरणातून तसेच रुग्णालयातूनही बरे होऊन परतणाºयांची संख्या मोठी असल्यामुळे पोलिसांमध्ये समाधान आहे.

- जितेंद्र कालेकर ठाणे : कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आल्यामुळे क्वारंटाइन केलेले ४१ अधिकारी आणि १५५ कर्मचारी असे १९६ पोलीस मंगळवारपासून पुन्हा ड्युटीवर रु जू झाले आहेत. आतापर्यंत सात अधिकाºयांसह ४0 पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून, त्यातील २२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. विलगीकरणातून तसेच रुग्णालयातूनही बरे होऊन परतणाºयांची संख्या मोठी असल्यामुळे पोलिसांमध्ये समाधान आहे.मुंब्रा पोलीस ठाण्यातील सर्वाधिक म्हणजे तीन अधिकारी आणि नऊ कर्मचारी अशा १२ जणांना कोरोनाची लागण झाली. यातील दोघे वगळता सर्वजण घरी बरे होऊन परतले आहेत. ठाणे शहर मुख्यालयातील १० कर्मचारी कोरोनाबाधित झाले. यातील सहा जणांनी कोरोनावर मात केली. ठाणेनगर एक अधिकारी, नौपाडा एक अधिकारी एक कर्मचारी, वर्तकनगर तीन, नारपोली, वागळे इस्टेट आणि विशेष शाखा प्रत्येकी एक, अंबरनाथ दोन आणि नियंत्रण कक्षातील एका अधिकाºयासह दोन कर्मचारी, अतिक्रमण विभाग, मध्यवर्ती, कळवा आणि कोपरी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे ३३ कर्मचारी आणि सहा अधिकारी हे ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात तर ठाणे ग्रामीण नियंत्रण कक्षातील एका अधिकाºयालाही कोरोनाची लागण झाली आहे.आतापर्यंत कोरोनाबाधितांच्या संपर्कामुळे हायरिस्कमध्ये समावेश झालेल्या मुख्यालयातील ३९ पोलिसांना होम क्वारंटाइन केले होते.त्यांच्यासह दोन अधिकारी आणि ५0 कर्मचाºयांना घरात विलगीकरणात तर उर्वरित १९६ जणांना केंद्रात ठेवण्यात आले होते.यात एकट्या मुंब्रा पोलीस ठाण्यातील १७ अधिकारी आणि ५२ कर्मचाºयांचा समावेश होता. मुख्यालयातील एका अधिकाºयासह ४0 जणांचाही यात समावेश होता.आता मुंब्रा पोलीस ठाण्यातील सर्वजण पुन्हा कामावर परतले आहेत. मुख्यालयात ४0 आणि वर्तकनगर २७ अशी तब्बल १९६ जणांची फौज पुन्हा कामावर रुजू झाल्याने पोलिसांना मोठा दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिसthaneठाणे