शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: रुग्णांसाठी ऑनलाइन बेड सुविधा, कॉल सेंटरही सुरू; ठाणे महापालिका आयुक्तांचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2020 01:21 IST

दोन दिवसांपूर्वीच राज्याचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्रीआदित्य ठाकरे यांच्या हस्ते, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि महापौर नरेश गणेश म्हस्के यांच्या उपस्थितीत या अ‍ॅपचे अनावरण झाले होते.

ठाणे : कोविड रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया सुलभ आणि सोयिस्कर व्हावी यासाठी ठाणे महानगरपालिकेने आॅनलाइन बेड अलोकेशन सिस्टम तयार केली असून त्यासाठीwww.covidbedthane.in या संकेतस्थळावरून वेबलिंक कार्यान्वित केली आहे. याशिवाय कोविबाबत नागरिकांच्या शंकांचे निरसन करण्याकरिता कॉल सेंटरही कार्यान्वित केल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ विपिन शर्मा यांनी दिली.दोन दिवसांपूर्वीच राज्याचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्रीआदित्य ठाकरे यांच्या हस्ते, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि महापौर नरेश गणेश म्हस्के यांच्या उपस्थितीत या अ‍ॅपचे अनावरण झाले होते. वेबलिंक उघडल्यानंतर रुग्णांना आवश्यक ती माहिती वेबलिंकद्वारे उपलब्ध करून दिलेल्या फॉर्मवर भरून दिल्यावर ती माहिती महापालिका मुख्यालयामधील मध्यवर्ती बेड अलोकेशन पथकाला प्राप्त होईल. माहितीच्या आधारे त्यास क्लिनिकल स्टेटसनुसार कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर किंवा डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची आवश्यकता आहे त्याचा निर्णय घेतला जाईल. रुग्णवाहिकेची मागणी केल्यास त्याची माहित अ‍ॅम्ब्युलन्स टीमकडे जाईल. त्यानंतर सबंधितांस सेंट्रल बेड अलोकेशन टीम आणि रुग्णवाहिकेची माहिती असणारा संदेश पाठविण्यात येईल.रुग्णवाहिकेत बसल्यानंतर ओटीपी विचारला जाईल. तो दिल्यानंतर रुग्णलयामध्ये दाखल करण्यासाठी नेऊन तसा अहवाल कोविगार्ड डॅशबोर्डच्या माध्यमातून रुग्णालयासही कळविण्यात येईल.शहरामधील नागरिकांचे कोविडबाबतीत शंकाचे निरसन करण्यासाठी महापालिकेने कॉल सेंटर कार्यान्वित केले आहेत. त्यासाठी ८६५७९०६७९१, ९२, ते ९८ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका