शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

coronavirus: ठाण्यातील हॉटस्पॉटची संख्या निम्म्यावर, २४ हॉटस्पॉट झाले कमी; सिनेमागृह, जिम राहणार बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2020 01:51 IST

शहरातील मॉलही बुधवारपासून सुरू झाले असून या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग, येणाऱ्या प्रत्येकाला सॅनिटाइझ करणे, अशा प्रकारे नियमांचे पालन केले जात आहे.

ठाणे : कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असून ठाणे शहरातील आता हॉटस्पॉटची संख्यादेखील निम्म्यावर आली आहे. महापालिकेने नव्याने केलेल्या सर्वेक्षणात शहरात आता केवळ १५ हॉटस्पॉट शिल्लक राहिले असून ही संख्या २४ ने कमी झाली आहे. यामुळे नव्या १५ हॉटस्पॉटच्या ठिकाणी ३० सप्टेंबर २०२० पर्यंत लॉकडाऊन कायम आहे.शहरातील मॉलही बुधवारपासून सुरू झाले असून या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग, येणाऱ्या प्रत्येकाला सॅनिटाइझ करणे, अशा प्रकारे नियमांचे पालन केले जात आहे. मात्र, सिनेमागृह, मॉलमधील सिनेमागृह, व्यायामशाळा, मनोरंजन उद्याने, तरणतलाव, बार, नाट्यगृह आणि सभागृह बंदच राहणार आहेत.ठाणे शहरात टप्प्याटप्प्याने वाढविलेल्या लॉकडाऊनची मुदत ३१ जुलैला संपल्यानंतर प्रशासनाने पुन्हा नव्याने सर्वेक्षण करून ३९ प्रतिबंधित क्षेत्रांची यादी जाहीर करून त्याठिकाणी ३१ आॅगस्टपर्यंत लॉकडाऊन लागू केले. ही मुदत संपुष्टात आल्यामुळे प्रशासनाने आता हॉटस्पॉट क्षेत्रांसाठी नवे आदेश काढले आहेत.हे आहेत १५ नवे हॉटस्पॉटनव्या १५ हॉटस्पॉट क्षेत्रांमध्ये कळवा प्रभाग समिती क्षेत्रातील मनीषानगर रस्ता ते मुंबई-पुणे मार्ग आणि जानकीबाई रामा साळवी रस्ता ते मनीषानगर गेट क्रमांक ३, मुंबई-पुणे मार्ग ते कुंभार लेन-चेऊलकर मार्ग आणि बँक आॅफ बडोदा ते सुन्नी शफी जामा मशीद, शिवाजीनगर मार्केट रस्ता ते शिवाजी तलाव आणि रेल्वेरूळ, भुसारआळीतील जय धनश्री सोसायटी ते चिंचपाडा रस्ता आणि जैन मंदिर ते अब्दुल हमीद रस्ता, विटाव्यातील भंडारपाडा रस्ता ते ऐरोली नॉलेज पार्क आणि ठाणे-बेलापूर मार्ग ते न्यू सूर्यानगर रस्ता, वागळे इस्टेट प्रभाग समिती क्षेत्रातील किसननगर-१मधील नेपच्यून एलिमेंट वाणिज्य इमारत ते मुंबईची हद्द व रस्ताक्रमांक १६ ते आश्रम रस्ता, रस्ता क्रमांक ३ ते शांताराम चव्हाण रस्ता व सेंट लॉरेन्स डिसोजा रस्ता तेबापुराव पाटील मार्ग, उथळसर प्रभाग समिती क्षेत्नातील रुस्तमजी गृहसंकुलातील अ‍ॅक्युरा आणि अझिनो इमारत, वर्तकनगर प्रभाग समिती क्षेत्रातील शिवाईनगरमधीलउपवन खेळाचे मैदान ते सिंधूसोसायटी व देवदयानगर ते प्रमिला औद्योगिक वसाहत, लोकमान्य-सावरकरनगर प्रभाग समिती क्षेत्रातील दोस्ती रेंटल इमारती, माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रातील मरीआईनगर, हायलॅण्ड रेसिडेन्सीफेज-१, पिरामल लेबर कॅम्पआणि यशस्वीनगर या भागांचा समावेश आहे.कल्याण-डोंबिवलीत हॉटस्पॉट क्षेत्रात लॉकडाऊन कायमकल्याण : कल्याण-डोंबिवलीत हॉटस्पॉट क्षेत्रात ३० सप्टेंबरपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार आहे. हॉटस्पॉट क्षेत्रात केवळ सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेत अत्यावश्यक सेवेची दुकाने सुरू राहतील. अन्य दुकाने सुरूकरता येणार नाहीत. महापालिका हद्दीतील हॉटस्पॉटची संख्या ४४ आहे.लॉकडाऊनसंदर्भात बुधवार, २ सप्टेंबर रोजी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी नव्याने आदेश काढला आहे. या आदेशानुसार हॉटस्पॉट क्षेत्र वगळता अन्य क्षेत्रात आधीच्या नियम व अटीनुसार दुकाने सुरू ठेवली जातील. त्याची वेळही सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत आहे. रेस्टॉरंट, उपाहारगृहे, खाणावळ यांना घरपोच सेवा देण्यास मुभा देण्यात आली आहे.च्नव्या लॉकडाऊनच्या आदेशानुसार आदरातिथ्य करणारी व राहण्याची व्यवस्था असलेली हॉटेल्स, गेस्ट रुम आणि लॉज १०० टक्के क्षमतेने सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे निवासी हॉटेल, लॉज, गेस्ट हाउस यांना दिलासा मिळाला आहे. तसेच विविध आस्थापनांच्या गट व वर्गवारीनुसार कर्मचारी संख्या वाढविण्याची परवानगी देण्यात आली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणेCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक