शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

coronavirus: ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत गुरुवारी १५८६ ने वाढ, ुदिवसभरात २९ मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2020 02:07 IST

ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोनाचे ३२९ नवे रुग्ण आढळले. शहरात २६ हजार ७३५ रुग्णांची नोंद आतापर्यंत करण्यात आली आहे, तर आतापर्यंत ८५१ मृत्यूंची नोंद झाली आहे. कल्याण-डोंबिवली परिसरात ४०५ रुग्णांची वाढ झाली, तर आठ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली.

ठाणे : जिल्ह्यात गुरुवारी कोरोना रुग्णांच्या संख्येत एक हजार ५८६ ने भर पडली. यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या एक लाख २८ हजार २९ झाली आहे. तर, २९ जणांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या आता तीन हजार ६४३ झाली आहे. विशेष म्हणजे ठाणे शहरात गुुरुवारी एकही रुग्ण दगावला नसल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोनाचे ३२९ नवे रुग्ण आढळले. शहरात २६ हजार ७३५ रुग्णांची नोंद आतापर्यंत करण्यात आली आहे, तर आतापर्यंत ८५१ मृत्यूंची नोंद झाली आहे. कल्याण-डोंबिवली परिसरात ४०५ रुग्णांची वाढ झाली, तर आठ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली.भिवंडी महापालिका क्षेत्रात १६ बाधित आढळले, तर एका मृत्यूची नोंद करण्यात आली. आता बाधितांची संख्या पाच हजार २६८ झाली आहे. मीरा-भार्इंदरमध्ये १८५ रुग्णांची, तर पाच जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अंबरनाथमध्ये ३१ रुग्णांची वाढ झाली असून एका जणाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बदलापूरमध्ये ८८ रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधितांची संख्या चार हजार ३३१ झाली. या शहरात एकही मृत्यू झालेला नाही. त्यामुळे मृतांची संख्या ७३ कायम आहे.नवी मुंबईत ३३५ रुग्ण वाढलेनवी मुंबई महापालिकेत ३३५ रुग्णांची, तर सात जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत बाधितांची संख्या २१ हजार ११२ झाली असून मृतांचा आकडा ६११ वर गेला आहे.वसई-विरारमध्ये२४० नवीन रुग्णवसई-विरार शहरात गुरुवारी दिवसभरात दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच दिवसभरात २४० नवे रुग्ण आढळून आले असून १०६ रुग्णांनी कोरोनावर मात केली. महापालिका हद्दीत आता एकूण रुग्णसंख्या १७ हजार ३०९ वर पोहोचली आहे.रायगडमध्ये ६१५नव्या रुग्णांची नोंदअलिबाग : रायगड जिल्ह्यात गुरुवार, ३ सप्टेंबर रोजी ६१५ नव्या कोरोना पॉझिटिव्हरुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे बाधित रु ग्णांचीसंख्या २८ हजार ४६१ वर पोहोचली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे