coronavirus: मीरा भाईंदरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या साडे 10 हजार पार ; 358 जणांचा मृत्यू  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 11:22 PM2020-08-15T23:22:49+5:302020-08-15T23:23:10+5:30

मीरा भाईंदर मध्ये कोरोनाच्या मृत्यूचे प्रमाण जास्त आहे . त्याच बरोबर रोज दिडशे ते दोनशे च्या संख्येत नवीन कोरोना रुग्ण सापडत आहेत .

coronavirus: The number of corona patients in Mira Bhayandar has crossed 10 and a half thousand; 358 people died | coronavirus: मीरा भाईंदरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या साडे 10 हजार पार ; 358 जणांचा मृत्यू  

coronavirus: मीरा भाईंदरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या साडे 10 हजार पार ; 358 जणांचा मृत्यू  

Next

मीरारोड - मीरा भाईंदर मध्ये कोरोना रुग्णांनी 10 हजारांचा आकडा ओलांडला असून शहरातील कोरोना रुग्णांची संख्या हि 10 हजार 560 इतकी झाली आहे . तर आता पर्यंत शहरात कोरोना मुळे 358 जणांचा मृत्यू झाला आहे . एकीकडे कोरोना रोखण्यासाठीच्या निर्देशांचे सर्रास उल्लंघन होत असल्याने कोरोनाचे रुग्ण व मृत्यूचे प्रमाण कमी करण्यात महापालिका आणि लोकप्रतिनिधी यांना अपयश आले आहे . आज शनिवारी आता पर्यंतचे सर्वात जास्त 11 कोरोना रुग्णांचे मृत्यू दिवसभरात झाले आहेत .

मीरा भाईंदर मध्ये कोरोनाच्या मृत्यूचे प्रमाण जास्त आहे . त्याच बरोबर रोज दिडशे ते दोनशे च्या संख्येत नवीन कोरोना रुग्ण सापडत आहेत . महापालिकेचे जोशी रुग्णालय व कोविड केअर मध्ये कोरोना रुग्णांवर मोफत उपचार केले जात असून डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी एकीकडे उपचाराचे काम करत असताना दुसरीकडे अनेक राजकारणी , नगरसेवक व महापालिका प्रशासन मात्र आपापल्या भागातील कोरोना निर्देशांच्या उल्लंघना कडे मात्र सोयीस्कर दुर्लक्ष करत आहेत .

जेणे करून शहरात सर्रास मास्क न घालता फिरणारे , गर्दी करणारे व बेकायदा विक्रेते मोकाट झाले असून त्यांना जबाबदारी आणि कारवाईचा कोणताच धाक उरलेला नाही . परंतु राजकारण्यांना मात्र राजकीय चमकोगिरी करण्यातच स्वारस्य असल्याचे पदोपदी दिसून येत आहे . यातूनच शहरात कोरोना रोखण्यासाठीच्या निर्देशांचे पालनच केले जात नसल्याने कोरोना संसर्ग कमी करण्यात अपयश आलेले आहे असे जाणकारांनी स्पष्ट केले .

शहरातील शनिवार रात्रीच्या महापालिकेच्या आकडेवारी नुसार कोरोना रुग्णांची संख्या 10 हजार 560 इतकी झाली आहे . यातील 8 हजार 647 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत . तर 358 लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे . आत पर्यंत 35 हजार 107 लोकांचे स्वाब नमुने घेण्यात आले होते . त्यातील 24 हजार 379 लोकांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत . 21 हजार 466 जणांना महापालिकेने स्वतःच्या देखरेखी खाली ठेवले आहे .

Web Title: coronavirus: The number of corona patients in Mira Bhayandar has crossed 10 and a half thousand; 358 people died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.