शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचताच आयसीसीने धमाका करून टाकला! ऑस्ट्रेलिया संघ बघतच राहिला...
2
संजय राऊत दोन महिने राहणार सार्वजनिक जीवनापासून दूर, समोर आलं चिंताजनक कारण, निवडणुकांच्या तोंडावर ठाकरे गटाची चिंता वाढली
3
IND vs AUS :हेजलवूडचा भेदक मारा! तिलक वर्माच्या पदरी भोपळा; ४९ धावांत भारताचा अर्धा संघ तंबूत
4
पुढच्या महिन्यात येतोय फिजिक्सवालाचा आयपीओ, ₹३८२० कोटी उभारणार, काय आहेत अधिक डिटेल्स?
5
एपीआयला हिरो व्हायचं होतं म्हणून रोहित आर्याच्या छातीत गोळी झाडली; अ‍ॅडव्होकेट नितीन सातपुतेंचा आरोप
6
WhatsApp वर येणार Facebook सारखं नवं फीचर; प्रोफाईलवर लावता येणार सुंदर कव्हर फोटो
7
धक्कादायक! रोहित आर्याने उर्मिला कोठारे, गिरीश ओक यांनाही स्टुडिओत बोलवलेलं, मुलांसोबत फोटोही काढले अन्...
8
राज ठाकरेंच्या मनसेचं उद्धवसेनेत विलिनीकरण होणार?; शिंदेसेनेच्या नेत्याचा दावा, 'तो' फोटो दाखवला
9
"बुलडोजरनं चिरडून 'त्यांना' 'जहन्नुम'मध्ये...", बिहारमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
10
Vastu Tips: खिडकीत, अंगणात पोपटाचे येणे हे तर लक्ष्मी कृपेचे शुभ चिन्ह; पाहा वास्तू संकेत!
11
अपहरणाचा सीन, फिल्म प्रोजेक्ट..., रोहित आर्याने मराठी अभिनेत्रीला केलेला मेसेज; स्क्रीनशॉट दाखवत म्हणाली....
12
महिलांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये लग्न पत्रिका आली, क्लिक करताच फोन हँग झाला अन्...; नव्या सायबर ट्रॅपने उडवली झोप!
13
आता घरबसल्या करा आधार कार्ड अपडेट; 'ई-आधार ॲप' लवकरच लॉन्च, काय-काय बदलता येणार?
14
Deepak Kesarkar : "...तर मी जीवाची पर्वा न करता तिथे गेलो असतो"; रोहित आर्याबद्दल काय म्हणाले दीपक केसरकर?
15
टीम इंडियाचे माजी कर्णधार अझरुद्दीन यांची नवी इनिंग; घेतली तेलंगणाच्या मंत्रिपदाची शपथ
16
रोहित आर्यामुळे मुंबई हादरली! यामीच्या सिनेमातील कथेसारखं सेम टू सेम किडनॅपिंग, तुम्ही पाहिलाय का 'तो' चित्रपट?
17
शुभमंगल सावधान !! स्मृती मंधनाच्या लग्नाची तारीख ठरली; 'या' दिवशी सांगलीत रंगणार लग्नसोहळा
18
युक्रेन युद्ध थांबवण्याच्या प्रयत्नांना मोठा धक्का! रशियाच्या 'या' अटी व्हाईट हाऊसला मान्य नाहीत
19
शेतकऱ्यांना 3000 रुपये, पाटण्याजवळ नवं शहर अन्...; बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'संकल्प पत्रात' NDA नं दिली मोठी आश्वासनं
20
'टॅरिफ वॉर'दरम्यान अमेरिकेने बदलला आपला सूर, भारतासोबत केला एक मोठा संरक्षण करार...

coronavirus: कोरोनाबाधितांची संख्या वाढली, मीरा भाईंदरमध्ये 1 ते 10 जुलैदरम्यान पुन्हा होणार लॉकडाऊन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2020 16:55 IST

लॉकडाऊनमध्ये सवलत देण्यास सुरुवात केल्यापासून लोकांची गर्दी आणि वर्दळ वाढली आहे . त्यातच बेकायदेशीर बाजार भरणे सुरूच आहे.

मीरारोड - मीरा भाईंदर मध्ये कोरोनाचे रोजचे वाढते रुग्ण आणि मृत्यूचे प्रमाण पाहता अखेर महापालिका आयुक्त डॉ . विजय राठोड यांनी 1 जुलै पासून 10 जुलै पर्यंत शहरात पुन्हा लॉक डाऊन जाहीर केले आहे . तर भाईंदर पूर्वेला नवघर पोलिसांनी आज मंगळवारीच दुकाने बंद करायला लावली . 

लॉकडाऊनमध्ये सवलत देण्यास सुरुवात केल्यापासून लोकांची गर्दी आणि वर्दळ वाढली आहे . त्यातच बेकायदेशीर बाजार भरणे सुरूच आहे . व्यायामाच्या नावाखाली लोकं मॉर्निग वॉक ला लांब जात आहेत . बाहेर कारण नसताना फिरणारे देखील कमी नाहीत . त्यातच मास्क न लावणे , सोशल डिस्टंसिंग न पाळणे हे नित्याचेच झालेले आहे . 

परिणामी शहरात सोमवार पर्यंत 3 हजार 165 कोरोना रुग्ण तर 142 जणांचा मृत्यू झालेला आहे . रोजचे शंभर वा दीडशे च्या घरात सापडणारे कोरोनाचे रुग्ण आणि रोज जाणारे तीन ते सहा जणांचे बळी या मुळे लोकां मध्ये भीतीचे वातावरण आहे . परंतु अनेक बेजबाबदार लोक मात्र कोरोना संसर्ग बाबत खबरदारी घेत नसल्याने त्यांच्या मुळे अन्य लोकांना देखील धोका निर्माण झाला आहे . 

कोरोनाची वाढती संख्या आणि मृत्यूचे प्रमाण तसेच निर्देशांचे होणारे उल्लंघन पाहता लॉक डाऊनचा निर्णय घेण्याची मागणी होत होती . आयुक्तांनी देखील 1 जुलैच्या सायंकाळी 5 वाजल्या पासून 10 जुलैच्या रात्री 12 वाजे पर्यंत लॉक डाऊन जाहीर केले आहे .  त्यामुळे नागरिकांना अत्यावश्यक कारणां साठीच बाहेर पडता येणार आहे . आयुक्त यांनी जारी केलेल्या आदेशात अन्नधान्य दुकाने, बेकरी, भाज्या, फळे, चिकन - मटण, मासे, अंडी आदींची दुकान व बाजारातून विक्री यावर बंदी घातली आहे . परंतु सदर जीवनावश्यक वस्तूंची या दरम्यान सकाळी 9 ते रात्नी 11 पर्यंत घरपोच सुविधा सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे .

दुधाची डेअरी सकाळी 5 ते सकाळी 10 वाजेपर्यंत तर पिठाच्या गिरण्या व औषध दुकाने नियमित वेळेत सुरु राहतील. बाकी सर्व दुकाने - व्यवसाय व उद्योग बंद राहणार आहेत . कॉल सेंटर व खाजगी कार्यालय 10 टक्के कर्मचारी ठेऊन सुरु ठेवता येतील .  हॉटेल व वाईन शॉप मधून पार्सल सेवा सुरु राहणार आहे . परवानगी प्राप्त बांधकाम चालू ठेवता येणार आहेत . लॉकडाऊन व जनता कर्फ्यूचे उल्लंघन तसेच अनावश्यक बाहेर फिरणाऱ्यांना बंदी असून बाहेर मास्क व सोशल डिस्टंसिंग चे पालन न करणाऱ्यांवर देखील थेट गुन्हा दाखल होणार आहे 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक