CoronaVirus News in Thane : ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे ३२२५ रुग्ण वाढले; आठ जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2021 08:51 PM2021-03-27T20:51:04+5:302021-03-27T20:51:29+5:30

CoronaVirus News in Thane: ठाणे शहर परिसरात ९१८ रुग्ण सापडले आहेत. या शहरात आजपर्यंत ७३ हजार ८५० रुग्ण नोंद झाले आहे.

CoronaVirus News in Thane: 3225 corona patients increased in Thane district; Eight people died | CoronaVirus News in Thane : ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे ३२२५ रुग्ण वाढले; आठ जणांचा मृत्यू 

CoronaVirus News in Thane : ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे ३२२५ रुग्ण वाढले; आठ जणांचा मृत्यू 

Next

ठाणे : जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्येत शनिवारीही मोठी वाढ झालेली आढळून आली. गेल्या २४ तासात साडे तीन हजार २२५ रुग्ण सापडले असून आठ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आता तीन लाख पाच हजार ७८४ रुग्ण झाले असून सहा हजार ४३२ मृतांची नोंद झाली आहे. (todays 3225 corona patients increased in Thane district)

ठाणे शहर परिसरात ९१८ रुग्ण सापडले आहेत. या शहरात आजपर्यंत ७३ हजार ८५० रुग्ण नोंद झाले आहे. आज मात्र एकही मृत्यू नसल्यामुळे मृतांची संख्या एक हजार ४३४ झाली. कल्याण - डोंबिवलीत ८२९ रुग्ण आढळून आले असून तिघांचे निधन झाले आहे. या शहरात आता ७५ हजार ४९३ बाधीत असून एक हजार २४३ मृत्यू झाले आहेत.

उल्हासनगरला १२२ रुग्ण आढळले असून एक मृत्यू आहे. आता या शहरात १३ हजार २८१ बाधीत झाले असून मृत्यू संख्या ३७८ झाले आहेत. भिवंडीला ५९ रुग्ण सापडले असून मृत्यू नाही. येथे सात हजार ४००  बाधितांची तर, ३५६ मृतांची नोंद आहे. मीरा भाईंदरला १७२ रुग्ण सापडले असून एक मृत्यू आहे. या शहरात आता २९ हजार ७४८ बाधितांसह ८१५ मृतांची नोंद आहे. 

अंबरनाथ शहरात १३१ रुग्ण सापडले असून एकही मृत्यू नाही. या शहरात आता दहा हजार २८६ बाधितांसह मृतांची संख्या ३१८ नोंदवण्यात आली. बदलापूर परिसरामध्ये १३० रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे बाधीत रुग्ण ११ हजार ८४७ झाले असून एकही मृत्यू नाही. तर, मृत्यूची संख्या १२३ आहे. जिल्हा परिषदेच्या गांवपाड्यांमध्ये ९४ रुग्णांचा शोध घेण्यात आला असून मृत्यू नाही. या गांवपाड्यांत २० हजार ८२३ बाधीत झाले असून ६०५ जणांचा मृत्यू झालेला आहे.

Web Title: CoronaVirus News in Thane: 3225 corona patients increased in Thane district; Eight people died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.