शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus News: धक्कादायक! ठाण्यात पुन्हा दोन दिवसात दहा पोलिसांना कोरोनाची लागण: बाधितांची संख्या ३१४

By जितेंद्र कालेकर | Updated: June 19, 2020 20:23 IST

परप्रांतीय मजूर त्यांच्या गावी पाठविण्याचे तसेच लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्यामुळे रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांना हटकण्याचे काम आता पोलिसांनी कमी केले आहे. तरीही पोलिसांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात कमी झालेले नाही. गेल्या दोन दिवसांमध्ये ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात दहा पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्देआतापर्यंत २४५ पोलिसांनी केली कोरोनावर मातबाजारपेठ पोलीस ठाण्याच्या तिघांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोना होण्याचे सत्र अद्यापही सुरुच आहे. बुधवार आणि गुरुवारी या दोन दिवसांमध्ये ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील एक महिला आणि दोन जमादारासह दहा पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. या सर्वांना ठाणे, अंबरनाथ आणि कल्याण येथील खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. त्यामुळे पोलिसांमधील बाधितांची संख्या ३१४ वर पोहचली आहे.गेल्या काही दिवसांमध्ये पोलिसांमध्ये कोरोना होण्याचे प्रमाण हे काही प्रमाणात कमी झाले होते. परंतू, १७ आणि १८ जून या दोन दिवसांमध्ये पुन्हा काही जणांना कोरोनाची लागण झाली आहे. १७ जून रोजी कल्याणच्या बाजारपेठ पोलीस ठाण्यातील दोन पोलीस हवालदारांसह तिघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. या तिघांना निआॅन, आर. आर. हास्पीटल आणि टाटा आमंत्रा या रुग्णालयांमध्ये दाखल केले आहे. कोळसेवाडीच्या एका पोलीस नाईकालाही बुधवारी टाटा आमंत्रामध्ये तर अंबरनाथच्या शिवाजीनगरच्या एका पोलीस नाईक महिलेला बदलापूरच्या पोतदारमध्ये तर अंबरनाथच्या पोलीस हवालदारालाही कोरोनाची लागण झाल्यामुळे त्याला सिटी हॉस्पीटल मध्ये दाखल केले. एकाच दिवशी या सात पोलिसांना वेगवेगळया रुग्णालयात कोरोनाच्या उपचारासाठी दाखल करावे लागले. दरम्यान, १८ जून रोजी पोलीस मुख्यालयाचे जमादार, वाहतूक नियंत्रण शाखेचे हवालदार आणि वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल अशा तिघांचा अहवालही १८ जून रोजी पॉझिटिव्ह आला. त्यामुळे या तिघांनाही वेदांत रुग्णालयात दाखल केले आहे.आता या सर्व कोरोनाबाधित पोलिसांच्या संपर्कातील व्यक्ती आणि पोलिसांची माहिती घेण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आतापर्यंत २९ अधिकारी आणि २८५ कर्मचारी अशा ३१४ पोलिसांना कोरोनाची लागण झाली. त्यातील दोघांचा मृत्यु झाला असून २४५ पोलिसांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.

टॅग्स :thaneठाणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिस