शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

CoronaVirus News : रुग्णांच्या सान्निध्यात राहून ती देतेय धीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2020 01:02 IST

स्वत: दोनदा पॉझिटिव्ह होऊन बरी झाल्यानंतर ती पुन्हा रुग्णांची सेवा करीत आहे.

ठाणे : कोरोनाच्या संकटात अनेक हौशे-गवशे कोरोना योद्धा म्हणून मिरवत आहेत. सोशल मीडियावर तर अशा स्वयंघोषित योद्ध्यांचा जणू महापूरच आला आहे. मात्र, या लढ्यात खरे योद्धे जीव धोक्यात घालून इतरांचा जीव वाचवत आहेत. ठाण्यातील एक कोरोना योद्धा महिला हेच काम करीत आहे. स्वत: दोनदा पॉझिटिव्ह होऊन बरी झाल्यानंतर ती पुन्हा रुग्णांची सेवा करीत आहे.ठाण्यातील वसंत विहार परिसरात आढळलेला पहिला रुग्ण होरायझन रुग्णालयत दाखल झाला होता. तो रुग्णही या ३५ वर्षीय महिला योद्ध्याने हाताळला. या रुग्णालयात दाखल झालेल्या सुमारे १०० हून अधिक रुग्णांची तिने सेवा केली. सहा वर्षीय मुलीपासून ते ७० वर्षीय वृद्धापर्यंत तिने सर्वांचीच काळजी घेतली. एका पोलिसासह त्यांच्या सहा वर्षीय मुलीला दाखल केल्यावर त्यांचीही तिने सेवा केली. लहान मुलीला जेवण भरविण्यापासून तिला आंघोळ घालण्यापर्यंतची कामे केली. तिचे सर्व हट्ट पुरविले. म्हणूनच ती बरी होऊन घरी गेल्यानंतर आजही तिची आठवण काढते. सुनीता नावाच्या या योद्ध्याला कोरोना वॉर्डमध्ये रुग्णांची सेवा करताना कोरोनाची लागण झाली. तरीही न डगमगता तिने या विषाणूचा मुकाबला केला. योद्ध्याप्रमाणे मुकाबला करून त्यातून पूर्ण बरी होऊन घरी आली. आता आधीचे काम गेल्याने ती मुलुंडमध्ये अ‍ॅपेक्स कोरोना रुग्णालयात कोरोना वॉर्डमध्ये रुग्णांची सेवा करते.ज्या रुग्णांचे मनोधैर्य खचलेले असते, त्यांना ती स्वत:चा अनुभव सांगते. ती दोनदा कशी या आजारातून बाहेर आली, त्याची कहाणी सांगून हिंमत हरलेल्या रुग्णांना धीर देते. रुग्णांना धीर देणाऱ्या या योद्ध्याचा चेहरा त्यांनी पाहिलेला नाही. पीपीई किटमध्ये लपलेले तिचे सडसडीत शरीर आणि कोरोनारक्षक चष्म्यातून तिचे दिसणारे डोळे हीच काय ती तिची ओळख आहे. ज्या वॉर्डात डॉक्टर, नर्स रुग्णांना हात न लावता लांबूनच त्यांची तपासणी करतात, तिथे ही योद्धा त्यांचे शरीर पुसून स्वच्छ करते, स्वत:च्या खांद्याचा आधार देऊन त्यांना शौचालयात घेऊन जाते, हाताने जेवण भरवते.>एकदा कोरोना होऊन गेल्याने त्याची कशी काळजी घ्यायची याची कल्पना आली आहे. कोरोनाबाधित असताना जे अनुभव आले, माणसांना ओळखण्याची संधी मिळाली, जे भोगले ते इतरांनी भोगू नये म्हणून पॉझिटिव्ह रु ग्णांची सेवा करते. या आजारामधून पूर्ण बरे होता येते हे माझ्या उदाहरणातून समजावून सांगते. दोन दिवसांपूर्वीच एक ज्येष्ठ नागरिक बरे होऊन घरी जात होते. तेव्हा मी किट काढलेल्या अवस्थेत खाली उभी होते. दुसºया मावशीसोबत बोलत होते. माझा आवाज ओळखून ते रु ग्ण माझ्याजवळ आले आणि तूच सुनीता ना? असे म्हणत त्यांनी माझे खास आभार मानले. यातच मला समाधान आहे. - सुनीता, ठाणे

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस